गांज्याचे रॅकेट खणून काढण्याचे आवाहन पुर्व भागातील तीस टक्के लोकांना गांजाचे व्यसन! :तरुणाई अडकली ; पोलिस कारवाईत सातत्य गरजेचे

0

उमदी, वार्ताहर:जत तालूक्यातील पुर्व भागातील शालेय विद्यार्थ्यासह अनेक युवक,नागरिक व्यसन करणार्‍या आणि नागरिक गांजासारख्या अमली पदार्थाच्या विळख्यात अडकल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. यासाठी चोरट्या मार्गाने अमली पदार्थाचा पुरवठा करणारे ‘रॅकेट’ जत तालूक्यात सक्रिय आहे. विशेष म्हणजे, अमली पदार्थ कायद्याअंतर्गत होणार्‍या कारवायात प्रामुख्याने गांजा प्रकरणाचाच समावेश असल्याचे पुढे आले आहे.जत पुर्व भागातील गांज्याविरोधातील कारवाई उमदी पोलिसांनी कडक केली आहे. अनेक मोठे छापे टाकले जात आहेत. मात्र कारवाईतील सातत्यच हा रुतलेले रँकेट खणून काढू शकते. त्यामुळे पोलिसांनी सतर्क राहणे महत्वपुर्ण आहे. जत तालूक्यातील उमदी परिसरात यापैकी गांजाची नशा करणार्‍यांची संख्या मोठय़ा प्रमाणावर आहे. त्यामुळे या भागात चोरून गांज्याची लागवड केली जात आहे. शिवाय गांजा कर्नाटकातून आयात करणारे रॅकेटच जत तालूक्यात  सक्रिय आहे. गांजाचा चोरट्या मार्गाने बाजार गरम आहे.आता उमदी पोलिसांनी कारवाईचा बगडा उचलल्याने काही प्रमाणात हा धंदा थांबल्याचे चित्र आहे. याकडे पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.सिमावर्ती भागातील गांजाच्या बाजारात वेगवेगळ्य़ा परप्रांतिय टोळ्य़ा सक्रिय असून, महिनाकाठी लाखो रुपयांची आर्थिक उलाढाल होत असल्याची चर्चा आहे. जत तालूक्यात अंमली पदार्थांपैकी गांजाचा वापर मोठय़ा प्रमाणावर होत असल्याची माहिती, समोर आली आहे. या अंमली पदार्थाच्या विळख्यात शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह प्रौढ नागरिकही अडले आहेत. तरुण मुले हे सिगारेटमध्ये या गांजाचा वापर करतात, तर वृध्द मंडळी हाच गांजा चिलमीतून ओढतात. अलिकडे या नशिली बाजारात तरुणांची संख्या वाढली आहे. या अमली पदार्थाच्या विळख्यात अडकलेल्या तरुणांकडून वेळप्रसंगी छोटी-मोठी गुन्हे घडत असल्याचाही धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. अल्पवयीन गुन्हेगारांमध्ये याचे प्रमाण अधिक असल्याचे आढळून आले आहे. ग्रामीण भागात सहजासहजी मिळणारा अंमली पदार्थ म्हणून सर्रास गांजाचाच वापर केला जातो. त्यासाठी फार पैसे मोजावे लागत नाहीत. या गांजाच्या पुड्या सहज उपलब्ध होत असल्याने, याचे प्रमाण जिल्ह्यात मोठे आहे. 

Rate Card

गांजाच्या विळख्यात मुले..जत तालूक्यातील पुर्व भागात सह जत शहर,तालुक्यातील अनेक गावात अल्पवयीन गुन्हेगारांचा आकडा दिवसेंदिवस वाढू लागला आहे. या अल्पवयीन मुलांमध्येही या अमली पदार्थाचे सेवन करण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. केवळ यासाठी लागणार्‍या पैशाची ‘तजवीज’ करत हौस करत आहेत. राजरोसपणे मिळणार्‍या गांजाच्या पुड्यांमुळे हे अल्पवयीन मुले ‘व्यसनी’ बनली आहेत. त्यातून त्यांच्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढू लागले आहे. ही चिंताजनक बाब असल्याचे मते जागृत नागरिकातून होत आहे.बाजारातील मास्टरमाईंट आणि प्रमुख एजंटाचा शोध घेण्यात पोलिसांनी पकडूूून हा व्यवसाय मुळासकट संपवावा अशी मागणी परिसरातील नागरिकांतून होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.