महावितरण कडून डिपीचा विजपुरवठा तोडण्याची मोहिम सुरूचं पिके अडचणीत : डफळापूर, शिंगणापूर, कुडणूरसह परिसरातील अनेक डिपी बंद ; शेतकरी मोर्चा काढणार

0

Rate Card

डफळापूर,वार्ताहर : डफळापूर महावितरणच्या सब टेशनची वाढलेली थकीत बाकी वसुलीसाठी ऐन पिके हातातोंडाला आलेल्या स्थितीत कारवाईचा बडगा उचलत काही थकीत बिलासाठी अख्या डिपीचा विजपुरवठा तोडण्याचे प्रकार डफळापूर, शिंगणापूर, कुडणूरसह परिसरात गेल्या तिन दिवसापासून सुरू आहे.

परिसरातील शेतकऱ्यांची बिले थकीत प्रमाण मोठे असल्याचे कारण देत महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून वसूली न झाल्यास विजपुरवठा तोडला जात आहेत. प्रत्यक्षात गत तीन-चार वर्षात शेती पिकली नाही. महावितरण कडून शेतकऱ्यांना दिलेली बिले अव्वाच्यासव्वा दिली आहे. त्यात सरकाच्या विविध माफीच्या घोषणा यामुळे अनेक शेतकऱ्यांनी बिले भरली नाहीत. किंबहुना दुष्काळी परिस्थिती मुळे बिले भरायची कोठून असा प्रश्न होताच. त्यात सरकारकडून सतत नवनविन फतवे काढल्याने बिले थकली. परिणामी सध्यस्थितीत शेतकरी कंगाल बनला आहे. जी पिके जोमदार आहेत. चांगले पैसे मिळतील अशी स्थिती निर्माण झाली असताना महावितरणकडून वसूलीसाठी सुलतानी प्रकार करत डिपीचा विजपुरवठा तोडण्याचे अजब प्रकार सुरू आहे. प्रत्यक्षात पिके अाली तरचं विजबिले वसुल होऊ शकतात. असे असताना उभी पिके विजे अभावी पाणी न मिळाल्यैस वाळवून घालवून महावितरणचे अधिकारी काय साध्य करणार आहेत. असा सवाल शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे. पिके आली,तर त्या उत्पन्नातून बिले भरता येतिल मात्र विजेअभावी उभी पिके वाळून गेली तर बिले भरायची कशी अशी परिस्थिती सध्या उद्भवली आहे. प्रत्यक्षात वापरलेली विज व दिलेली  बिले यात मोठ्या तफावती आहेत.ज्या शेतकऱ्यांनी व्यवस्थित बिले भरली आहेत. तेही या कारवाईत भरडले जात आहेत. त्यामुळे विजपुरवठा तोडण्याचे प्रकार थांबवावेत अशी मागणी होत आहे.

चुकीच्या पध्दतीने वसूली 

महावितरण कंपनीकडून थकीत बिले वसुलीसाठी चुकीची पध्दत अवलंबली जात आहे. प्रत्यक्षात यावर्षीच पिके चांगली आहे. पैसे हातात येण्याची स्थिती आहे. तशात महावितरणच्या या सुलतानी वसूलीमुळे आम्हा शेतकऱ्यांना उध्दवस्त करण्याचा प्रकार सुरू आहे. तो वेळीच रोकावा अन्यथा गंभीर परिणामाला सामोरे जावे लागेल.

पोपटराव पुकळे, माजी ग्रामपंचायत सदस्य

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.