नाटक : अशीही श्यामची आई , संघर्षातून नाती जपणारी ,

0

आई सारखे दैवत साऱ्या जगतावर नाहीहे वाक्य आपणाला सर्वाना माहित आहेचआई म्हणजे प्रेमवात्सल्यमायाममता सारे काही त्यात येतेमुलांची पहिली गुरु हि आई असतेआपला संसार सांभाळत ती आपल्या मुलाबाळांना वाढवत असतेआईमुलाचे नातं हे एक जगावेगळं नातं आहेआई हि मुलांना घडवतेत्याला चांगले संस्कार देतेत्याला माणूस म्हणून जीवनाकडे पाहायला शिकवतेपण हि ” श्यामची आई ” जरा वेगळी आहेव्यक्तीला काही आजार झाला तर नातीगोती मध्ये बाधा येतेत्या व्यक्तीला त्रास होतोआणि इतरांनाही तो त्रास सहन करावा लागतोअश्याच एका आईची कथा ” अशी हि श्यामची आई ” मध्ये स्वप्नील जाधव यांनी मांडली आहे.

सुधीर भट थिएटर आणि ऐश्वर्या प्रोडक्शन या नाटयसंस्थेने या नाटकाची निर्मिती केली आहेनिर्माते कांचन सुधीर भटराजेश पाटील हे असून सुयोग सादर करीत आहे अशीही श्यामची आई हि नाटयकृती.दिगदर्शन स्वप्नील बारस्कर यांचे असून नेपथ्य प्रसाद वालावलकर यांचे आहेप्रकाश योजना भूषण देसाईवेशभूषा महेश शेरला यांची असून पार्श्वसंगीत अभिजित पेंढारकर यांनी दिले आहेया मध्ये ओमप्रकाश शिंदेपूर्णिमा अहिरेप्रवीण डाळिंबकरमृणालिनी जावळेशुभम इंदुलकरसारंग शिरसाटआतिशा नाईक या कळकरांनी आपापल्या भूमिकेला योग्य न्याय दिलेला आहे.

आपण आपल्या चौकटीत जगणारी माणसं आहोतआपण आपल्या विश्वात राहून आपली जगण्याची स्वप्न पाहत असतोआपण अनेकदा वास्तववादी जीवन जगायला घाबरतोआपल्याला ते जगणं असह्य होतं, “अशीही श्यामची आई ” मध्ये आईला एका असाध्य रोगाने ग्रासलेलं असतेखूप आधीपासून तिला ” फिट्स ” येत असतातत्या रोगाशी सामना करीत ती आपले आयुष्य घालवीत असतेतिचे यजमान ह्या जगात नसताततिला श्याम नावाचा मुलगा असतो आणि त्या मुलाचे आपल्या आईवर खूप प्रेम असतेएका चाळीमध्ये त्यांचे जीवन बऱ्यापैकी चाललेलं असतेचाळीमधली मंडळी राणे काकू– राणे काकाआणि पिंटया हे आपापल्या परीने मदत करीत असतातपण फिट्स येण्याच्या रोगामुळे श्यामच्या आईचा स्वभाव हा चिडचिडा बनलेला असतोअश्या अनेकविध छटा असलेल्या व्यक्तिरेखा ह्या नाटकात रंगवल्या आहेत.

श्यामच्या आईचे आपल्या मुलावर अतोनात प्रेम असते आणि श्याम सुद्धा आपल्या आईची काळजी घेत आपली नोकरी करीत असतोश्यामचे मृण्मयी नावाच्या मुलीवर प्रेम असते ते दोघे लग्न करण्याच्या विचारात असतातएक दिवस मृणमयी श्यामच्या घरी येते त्यावेळी तिला श्यामच्या आई विषयी सारे काही समजतेआपल्या रोगामुळे आईचा स्वभाव चिडचिडाफटकळ असा बनलेला असतोत्यांच्या ह्या वागण्याने श्याम आणि मृणमयी मध्ये दुरावा निर्माण होतो.

आई आणि मुलगा यांच्या नातेसंबंधावरच नाटयमय प्रसंग खुलत गेले आहेतचाळीमधील मंडळींचे वागणे बोलणे हे योग्यत्या प्रसंगाने खुलवले आहेआईला आता आईची जागा घेता येत नाही तिचे वागणे हे एका लहान अजाण बालका प्रमाणे झालेलं असतेलहान मुलाची काळजी जशी घ्यायला पाहिजे त्या प्रमाणे श्याम आपल्या आईची देखभाल मनापासून करीत असतोत्याच्या तिचे आईबाबा व्हावे लागतेआई मुलाच्या ह्या बदललेल्या नात्याला चाळींमधील लोकांची साथ मिळतेअर्थात आईच्या वागण्याचा त्रास हा राणे काकाकाकूंना होत असला तरी नातेसंबंध हे मायाळूप्रेमळ बनलेले असल्याने त्या सारे सहन करीत त्यांना मदतच करतातचाळीमधील माणसांच्या भावना नातेसंबंधात आपुलकीच्या भावना असतात हे राणे काकाकाकू यांच्या व्यक्तिरेखेमधून दाखवले आहे.

Rate Card

श्यामची आई त्याला कधी रागानेकधी प्रेमाने समजावते तर कधी अबोला धरते आणि त्याला सांभाळून घेण्याचा प्रयत्न करतेश्यामला तिचा आजार माहित असला तरी कधीकधी त्याची चिडचिड अनावर होते आणि भावनेच्या भरात त्याच्या वागण्यात फरक सुद्धा पडतोअसे हे आई मुलाचे अनोखे नातेसंबंध असलेलं गंभीर विषयावरील नाटक विनोदाची झालर देऊन सादर केलं आहेआजकालच्या काळात माणसे खूप व्यवहारी झालेली दिसतातव्यक्तीव्यक्ती मधील आपुलकीची भावना लोप पावत चाललेली आपणास जाणवतेचाळीमध्ये सुद्धा असेच वातावरण असतेमुलगा – आई यांच्या आयुष्यातील येणारे संघर्ष नाटयमय रीतीने मांडले आहेतचाळीमधील नाती हि रक्ताची नसली तरी आपुलकीची असतात.

श्यामची भूमिका ओमप्रकाश शिंदे यांनी मनापासून सादर केली आहेमुलाच्या कर्तव्याच्या भावनाप्रेममाया हे सारे त्यांनी छान पेश केलं आहेआतिशा नाईक यांनी सादर केलेली श्यामच्या आईची भूमिका खूपच परिणाम साधून जातेआईच्या सर्व रागलोभ– इत्यादी छटाशेजारीपाजारी लोकांशी वागणेआजारपणामुळे आलेला विक्षिप्तपणा अश्या सर्वच छटा त्यांनी उत्तम दाखवल्या आहेतराणे काकू ची भूमिका पौर्णिमा अहिरे यांनी दमदारपणे सादर केलीप्रवीण डाळिंबकर यांचा राणेकाका सुद्धा लक्षांत राहतातमृणालिनी जावळे ची मृण्मयी ठीक वाटली.

एकंदरीत ” संघर्षामधून नाती जपणारे ” हे नाटक आहे.

दीनानाथ घारपुरे मनोरंजन प्रतिनिधी ९९३०११२९९७

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.