उपनगराध्यक्ष निवड नव्या वर्षात विशेष सभा 4 जानेवारीला बोलविली ; सत्ता स्थापनेचा गुंता मात्र कायम

0

जत,प्रतिनिधी : जत नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष व स्विकृत नगरसेवकांच्या निवडीचा कार्यक्रम गुरूवार ता.4 जानेवारी 2018 ला ठेवण्यात आला आहे. त्यांच्या विशेष सभेची नोटिस नगराध्यक्ष शुंभागी बन्नेनावर यांनी काढली आहे.यावेळीच दोन स्विकृत नगरसेवक व गटनेत्याची निवड करण्यात येणार आहे.

जत नगरपालिकेची नुकतीच निवडणूक झाली आहे. त्यात कॉग्रेसच्या शुंंभागी बन्नेनावर नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या आहेत. त्यांनी पदभार स्विकारलाआहे.उपनगराध्यक्ष,स्विकृत नगरसेवक व गटनेत्याची निवडीसाठी विशेष सभा ता.4 जानेवारीला बोलविली आहे. त्यात 10 ते 12 पर्यत उपनगराध्यक्ष,दुपारी 1 ते 1.30 पर्यत स्विकृत नगरसेवक, तर दीड वाजता गट नेत्यांची निवड होणार आहे.

Rate Card

उपनगराध्यक्ष पदासाठी गुरूवारी 4 जानेवारी सकाळी 10 ते दुपारी 12 पर्यत मुख्याधिकारी यांच्याकडे नामनिर्देशन पत्र सादर करावयाचे आहे. त्याची छानणी 12 ते 12.15 पर्यत तर, माघारीसाठी 15 मिनिटाचा कालावधी ठेवण्यात आला आहे. माघारीनंतर लगेच निडणूक घेण्यात येणार आहे.निकालही लगेच घोषित करण्यात येणार आहे. स्विकृत नगरसेवकांसाठी ता. 3 जानेवारीला सकाळी 11 पर्यत नामनिर्देशन पत्रे उपविभागीय अधिकारी जत यांच्याकडे सादर करावयाची आहेत. त्यांची निवड गुरूवारी ता.4 ला दुपारी 1 वाजता जाहीर करण्यात येणार आहे.

दरम्यान सत्ता स्थापनेचा गुंता अद्याप सुटलेला नाही. कुणाची युती कुणाबरोबर होणार याबाबत अद्यापही चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. त्यामुळे कुणाची सत्ता येणार याबाबत निश्चित कुणाला सांगता येत नाही. 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.