स्व:तावर विश्वास ठेवून प्रयत्न केल्यास यश निश्चित डीवायएसपी नागनाथ वाकुर्डे ;तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात स्वप्नाली मोटे, रोहित मालांडे प्रथम

0

माडग्याळ,वार्ताहर:

      ‘जत सारख्या दुष्काळी भागात होतकरू विद्यार्थी घडणे आवश्यक आहे, विद्यार्थ्यांनी स्व:तावर विश्वास ठेवावा, जत तालुक्याशी माझे नाते जुळले आहे, या भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक विकास झाला पाहिजे, पालक आपल्या पाल्यांना शिकवताना जे कष्ट घेतात त्याचे विद्यार्थ्यानी चीज करून दाखवत या भागाचा नावलौकिक मिळवावा असे प्रतिपादन जतचे उप विभागीय पोलीस अधिकारी नागनाथ वाकुर्डे यांनी केले. ते पंचायत समिती शिक्षण विभाग जत व गजानन हायस्कूल जाडरबोबलाद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 43 व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या बक्षिस वितरण समारंभात  बोलत होते.

Rate Card

      यावेळी त्यांनी शिक्षण सभापती तम्मानगौडा रवीपाटील यांचे विशेष कौतुक केले.वाकुर्डे पुढे म्हणाले, विद्यार्थ्याप्रती जे तळमळ आहे ते वाखण्याजोगे असल्याचे ते म्हणाले. त्यावेळी ते जत सारख्या भागात काम करताना जो अनुभव आला त्याबद्दल आपले मत व्यक्त केले. जत मध्ये काम करत असताना कर्तव्याच्या पलीकडे जाऊन आपले या तालुक्यातील लोकांशी नाते जुळले अाहे. जत मधून बदली होऊन जाताना खूप वाईट वाटेल. असे सांगताना तै भावूक झाले.

        शिक्षण सभापती तम्मानगौडा रविपाटील म्हणाले, विद्यार्थ्यानी समाजासाठी, देशासाठी, आपल्या कुटुंबासाठी काहीतरी करून दाखविणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यानी महावैज्ञानिक ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा आदर्श घ्यावा. विद्यार्थ्यानी तालुकास्तरीय बरोबरच जिल्हा व राज्य स्तरीय स्पर्धेत भाग घ्यावा. क्रमांकाला महत्व न देता आपल्या कलागुणांना जगासमोर आणावे. यावेळी त्यांनी सहभाग घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. 

      यावेळी प्रमुख पाहुणे असलेले अधिकारी वाकुर्डे यांच्यामार्फत बक्षिसे वितरण करण्यात आले.या  विज्ञान प्रदर्शन स्पर्धेत 6 ते 8 वी च्या गटात प्रथम क्रमांक श्री दत्त माध्य. विद्यामंदिर जतची विद्यार्थीनी स्वप्नाली मोटे हिने पटकावला.तर 8 ते 12 वीच्या गटात श्री. गजानन हायस्कूल जाडरबोबलादचा विद्यार्थी रोहित मालांडे याने मिळवला. यावेळी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून इतर स्पर्धाही आयोजित करण्यात आल्या होत्या. प्रश्न मंजुषा स्पर्धा, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.निबंध स्पर्धेत लहान गटात पूजा शिंदे हिने प्रथम, सोनाली व्हनमाने हिने व्दितीय व सानिका कुंभार हिने तृतीय क्रमांक पटकावला.मोठ्या गटात योगेश्वर हत्तळी, कु. निकिता निकम, व स्नेहा दाशाळ यांनी अनुक्रमे प्रथम व्दितीय व तृतीय क्रमांक पटकावला.या पारितोषिक वितरण समारंभास माजी प.स. सभापती आर. के. पाटील, बसवराज बिरादार,सदानंद वाघमारे आदि मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन विज्ञान मंडळाचे प्रमुख वाली सर व अध्यक्ष माने सर यांनी केले. आभार विठ्ठल पाटील यांनी मानले.

फोटो

जाड्डरबोबलाद ता.जत येथे आयोजित 43 व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनातील यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षिस वितरण करताना डीवायएसपी नागनाथ वाकुर्डे, सभापती तम्मानगोंडा रवी उपस्थित होते

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.