स्थानिक आठवडी बाजारात शेळ्याचे दर पाडून शेतकऱ्यांना लुटण्याचा उद्योग

0

Rate Card

जत,प्रतिनिधी : गेल्या 20-25 वर्षांपासून जत तालुक्यातील अनेक गावात आठवडी बाजारात भरत असलेल्या शेळी बाजारात शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लूट होत आहे.अशा स्थानिक शेळी बाजारावर कुणाचेही नियत्रंण नसल्याने व्यापारी मनमानी करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला.
तालुक्यातील अनेक गावात आठवडी बाजारात शेळी बाजार भरविला जातो. यात जवळपास 5-7 लाखांची उलाढाल होते तालुक्यातील डफळापूर सारख्या अनेक गावात आठवडी बाजार दिवशी शेळ्याचा बाजार भरत आहे. त्यावर कुणाचेही नियत्रंण नाही. त्यामुळे तेथे व्यापारी कशाही किंमती ठरवत आहेत.जत, माडग्याळच्या बाजारातही अनेकवेळा दर पाडण्यात येत असल्याचे शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. शेतकरी मोठ्या प्रमाणात आपल्या शेळ्या विकण्यास येतात. शेळी खरेदीसाठी आंध्रप्रदेश, तेलंगणा आणि मराठवाड्यासह इतर भागातील व्यापारी मोठ्या प्रमाणात येतात. सर्व व्यापारी एका जागी गोळा होऊन शेळ्यांचे दर ठरवून बोली लावतात. यात शेळी विक्रेत्याला बोलूच दिले जात नाही.
बाजारात दलाल व व्यापाऱ्यांचे संगनमत असल्यामुळे अत्यंत कमी दराने शेतकऱ्यांच्या शेळ्या खरेदी केल्या जातात. दिवसाढवळ्या शेतकऱ्यांची लूट होताना बाजार समिती डोळे मिटून आहे.

शेळीचे दर पाडतात
व्यापारी आणि दलाल मिळून शेळ्यांचे दर पाडतात.  त्यामुळे खरेदीदारांचे चांगलेच फावत आहे.जत तालुक्यातील अनेक स्थानिक शेळी बाजारातही अशा घटना घडल्या आहेत. सामान्य शेतकरी तक्रारी करण्यास धजावत नाहीत. त्यामुळे काही व्यापारी मनमानी करत असल्याचे शेतकऱ्यांचे आरोप आहेत.

चौकट

 शेळ्याचा बाजारातील काही तक्रारी आमच्यांकडे येत नाहीत. त्यामुळे तेथील परिस्थिती समजत नाही. व्यापाऱ्यांकडून दमदाटी किंवा आर्थिक फसवणूक होत असल्यास बाजार समितीकडे लेखी तक्रार करावी. चौकशी करून तत्काळ कायदेशीर कारवाई केली जाईल.

श्री चौधरी साहेब
सचिव,राजे विजयसिंह डफळे दुय्यम आवार,जत

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.