राजकीय वादातून तुंबळ हाणामारी सोन्याळ मधील घटना ; दोन्ही गटाचे सुमारे दहाजण गंभीर जखमी

0

माडग्याळ,वार्ताहर : जत तालुक्यातील सोन्याळ येथे राजकीय वैमनस्यातून दोन गटात काठ्या,दगड,प्लॉस्टिक पाईपने तुंबळ हाणामारी झाली. त्यात दोन्ही गटाचे सुमारे दहाजण जखमी झाल्याचे वृत्त आहे. जखमीवर मिरज ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबतचा रात्री उशिरापर्यत उमदी पोलिसात गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.

Rate Card

घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की,सोन्याळ मधील भाजपचे माजी उपसंरपच चिंदानंद तेली,व कॉग्रेसचे कार्यक्रर्ते श्रीशैल चौगुले गटात जुना राजकीय वाद आहे.ग्रामपंचायत निवडणूकीच्या वादातून तेली गटातील एका कार्यक्रर्त्याला मारहाण झाल्याने हा प्रकार घडल्याचे समजते. सोमवारी सकाळी 10 वाजता चौकात घटना घडली. कॉंग्रेसचे श्रीशैल चौगुले व भाजपचे चिदानंद तेली या दोन्ही गटातील कार्यकर्त्ये समोरा समोर भिडल्याने वादावादीवातीतून तुंबळ हाणामारी सुरु झाली. गदडफेक,काठ्या, व पाईपच्या हाणामारीत पळापळ झाली. मात्र दोन्ही गट एकमेकाला भिडल्याने दोन्ही गटाचे कार्यकर्ते जखमी झाले आहेत. हाणामारी राजकीय वादातून झाली असावी अशी प्राथमिक अंदाज आहे. दोन्ही गटाच्या कार्यकर्ते सकाळी आमने सामने भिडले, यादरम्यान काठी, दगड व प्लास्टिकच्या पाईपचा वापर हाणामारी करताना करण्यात आला. या तुंबळ हाणामारीत सुमारे दहा जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. जखमींच्या हाताला, पायाला व काही जणांचे डोके फुटले आहे. त्याच्यांवर उपचार सुरु असून जखमींची निश्चित संख्या अद्याप समजलेली नाही. मात्र सुमारे दहाजण दाखल झाल्याचे समजतयं. रात्री उशिरा उमदी पोलीस ठाण्यात याबाबत कोणतीच तक्रार दाखल नव्हती.जखमी मिरज रुगणालयात दाखल असल्याने गुन्हा रात्री उशिराने दाखल होणार असल्याचे समजले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.