राष्ट्रवादीशी सत्ता स्थापनेला विरोध करत कॉग्रेस नगरसेवकांचे राजीनामा नाट्य कॉग्रेस बैठकीत खडाजंगी
जत,प्रतिनिधी : जत नगरपालिकेत निवडून आलेले माजी नगराध्यक्ष इकबाल गंवडी यांनी राष्ट्रवादीशी आघाडी करण्यास विरोध करित पक्षनेते विक्रम सांवत यांच्या कडे राजीनामा दिला.राष्ट्रवादीशी आघाडी करण्यासंदर्भात कॉग्रेसची बैठकीत गंवडी यांनी विरोध दर्शवत राजीनामा दिला असल्याची चर्चा आहे.बुधवारीच नव्या नगरसेवकांनी कार्यभार स्विकारला आहे.
जत नगरपालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणूकीत कॉग्रेसच्या शुंंभागी बन्नेनावर नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या आहेत. मात्र त्रिशंकू कौल दिल्या मुळे कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नसल्याने दोन पक्षांनी आघाडी करून सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. सध्या देश व राज्यातील राजकीय परिस्थिती पाहता कॉग्रेस व राष्ट्रवादीने पालिकेत एकत्र येत सत्ता स्थापन करावी असे आदेश वरिष्ठ नेत्यांनी दिल्याचीही चर्चा आहे. त्यावर बैठकीत विचारविनिमय सुरू होता.माजी नगराध्यक्ष गंवडी व अन्य एका माजी पदाधिकाऱ्यांचे निडणूक काळात राष्ट्रवादीशी मोठ्या प्रमाणात वितुष्ठ आले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीशी आघाडी करण्यास त्यांचा विरोध आहे. दोघावरही राष्ट्रवादीने टिका केली होती.पुन्हा त्यांच्या सोबत कारभार करणे अवघड होईल. त्यामुळे आघाडी करू नये अशी भुमिका त्यांची आहे. मात्र पक्षादेश डावलता येणार नाही,असे नेते विक्रम सांवत यांनी सांगितले.त्यावर नाराज होत गंवडी यांनी राजीनामा दिला असल्याचं कळतयं.
मुळ वसंतदादा आघाडीतून कॉग्रेसमध्ये प्रवेश केलेले माजी नगराध्यक्ष गंवडी कॉग्रेस कडून प्रभाग 5 मधून सर्वसाधारण जागेवर विजयी झाले आहेत. बुधवारीच त्यांनी नुतन नगराध्यक्ष शुंभागी बन्नेनावर यांच्याकडे पदाची सुत्रे दिली आहेत.त्यात गुरुवारी अचानक आपल्या पदाचा राजिनामा कॉग्रेस नेते विक्रम सांवत यांच्याकडे दिल्याने तर्कवितर्क लढविले जात आहेत. दरम्यान गंवडी म्हणाले, माझ्या व्यक्तिगत व घरगूती अडचणीमुळे राजीनामा देत आहे.

