डफळापूरात जुगार अड्ड्यावर छापा :87 हाजार मुद्देमाल जप्त

0
5

जत,प्रतिनिधी:

तालुक्यातील डफळापूर येथे जुगार आड्यावर छापा टाकून  पोलीसांनी 87  हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त कलण्यात आला आहे. याप्रकरणी तिन संशयीतांना अटक करण्यात आली आहे .ही कारवाई बुधवारी सायंकाळी करण्यात आली .

           याबाबत अधिक माहिती अशी की , डफळापूर एस टी पिकअप शेड परिसरात  बेकायदेशीर जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती  पोलीसांना मिळाली. उपनिरीक्षक रणजीत गुंडरे व कर्मचारी विनायक शिंदे , महेश मुळीक यानी छापा घालून गैबी राजू कांबळे,अमित सहदेव म्हेत्रे रा. दोघे आंबेडकर नगर जत व राजू भाऊसाहेब छत्रे रा. डफळापूर या तिघाना अटक केली.  त्यांच्याकडून रोख 22 हजार रुपये, एक दुचाकी मोटर सायकल आणि तिन मोबाईल संच असा 87 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. पुढील तपास जत पोलीस करत आहेत .

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here