शहराच्या विकासासाठी नगरसेवकांनी एकत्र यावे : शुंंभागी बन्नेनावर

0

त, प्रतिनिधी:

 जत शहराच्या विकासासाठी जनतेने आपणास निवडून दिले आहे.  त्यासाठी सर्व नगरसेवकांनी एकत्र यावे, असे आवाहन नुतन नगराध्यक्षा शुंभागी बन्नेनावर यांनी केले. 

बन्नेनवर व नुतन 20 नगरसेवकांनी बुधवारी कार्यभार स्विकारला. बन्नेनवर यांनी मावळते नगराध्यक्ष इकबाल गंवडी यांच्याकडून पदभार स्विकारला. यावेळी 

Rate Card

कॉग्रेस नेते विक्रम सांवत, जिल्हा परिषद सदस्य महादेव पाटील उपस्थित होते. मान्यवरांनी बन्नेनावर यांचा सत्कार केला. सर्व नगरसेवकांनी कामकाजास सुरूवात केली.

 नगरमंडळाची मुदत मंगळवारी संपल्याने नवे पदाधिकाऱ्यांना जबाबदारी देण्यात आली. भाजप,राष्ट्रवादी व कॉग्रेसच्या नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी बन्नेनावर यांचा सत्कार करत शुभेच्छा दिल्या.पाच वर्षापुर्वी स्थापन झालेल्या नगरपालिकेत पहिल्या थेट व महिला नगराध्यक्ष म्हणून शुंंभागी बन्नेनावर यांनी पदभार स्विकारला. 

यापुढे सर्वांना पक्षभेद न करता जतच्या विकासासाठी काम करू,जतला स्वच्छ, सुंदर व आदर्श बनविण्यासाठी सर्व पक्षाच्या नगरसेवक व नेत्यांनी सहकार्य करावे असे आवाहन सावंत यांनी केले.

जतच्या पहिल्या थेट नगराध्यक्ष शुंभागी बन्नेनावर यांनी पदभार स्विकारला. त्यानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.