संखमध्ये जुगार अड्डयावर छापा उमदी पोलिसांची कारवाई:सातजण ताब्यात

0

उमदी, वार्ताहर :

       संख ता. जत येथील जुगार अड्ड्यावर मंगळवारी रात्री 12 च्या सुमारास उमदी पोलिसांनी छापा टाकून 5580 रु मुद्देमालासह सातजणाना ताब्यात घेतले आहे.

       उमदी पोलीस ठाण्यास नविन अधिकारी आल्याने पुन्हा दंबगगिरी चालू झाली आहे. नुतन सपोनि भगवान शिंदे आल्यापासून अवैध धंदेवाल्यांनी आपल्या तलवारी म्यान केल्या आहेत. त्याचाच परिणाम म्हणून उमदी पोलीस ठाणे हद्दीतील सर्वच अवैध धंदे बंद करण्याच्या मागे उमदी पोलिस लागले आहेत.

Rate Card

   जुगार अड्ड्यावर एखादा पोलिस कर्मचारी अथवा अधिकारी जावून कारवाई करण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्यावर राजकिय दबाव टाकला जायचा, परंतू कोणत्याही दबावाला न जुमानता उमदी पोलिसांनी मंगळवारी रात्री संख येथील जुन्या बस स्टॅंडच्या पाठीमागे सुरु असलेल्या जुगार अड्डयावर छापा टाकत संगाप्पा गोपाल कांबळे, यशवंत शंकर कोळी, मल्लिकार्जुन लक्ष्मण कोळी, लक्ष्मण भीमाण्णा जाधव, सदाशिव नारायण धाबेकर, संतोष कामाण्णा धाबेकर, मारुती कृष्णा धाबेकर यांना ताब्यात घेत कारवाई केली. यात सात आरोपीकडील 5580 रु रोख रक्कम जप्त केली आहे. या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान शिंदे, उपनिरीक्षक प्रवीण सपांगे, पोलीस श्रीशैल वळसंगे, नितिन पलुसकर यांनी सहभागी घेत कारवाई केली. 

            चौकट

     उमदी पोलिस ठाण्याच्या हद्दीत गेली कित्येक वर्षे अनेक जुगार अड्डे राजरोसपणे चालु होते.परंतू नुतन सहायक पोलिस अधिकारी भंगवान शिदे आल्यापासून सर्वच जुगार अड्डे बंद करत कारवाई केली जात असल्याने गुन्हेगारी प्रवृतीच्या लोकांची दादागिरी थांबल्याचे चित्र आहे. त्यामुळे जनतेतून समाधान व्यक्त होत आहे. कोकरुड पोलिस ठाण्यातून त्यांची बदली वादग्रस्त अधिकारी म्हणून झाली असली तरी त्यांची उमदी पोलिस ठाण्यातील कामगिरी समाधानकारक असल्याचे चित्र आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.