उटगी वार्ताहर: उटगी(ता.जत) येथील चनक्का धरेप्पा संख (वय-60)यांचा विहिरीत पाय घसरून पडल्याने मुत्यू झाला.याबाबचा गुन्हा उमदी पोलिसांत दाखल झाला आहे.
याबाबत उमदी पोलीसांकडून मिळालेली अधिक माहिती की,चनक्का धरेप्पा संख ही महिला मंगळवार 19 डिसेंबरला सायंकाळी 4च्या दरम्यान दरम्यान आपल्याच शेतात वैरण काढण्यासाठी गेल्या होत्या. दरम्यान विहिरीजवळ असणाऱ्या बोराच्या झाडाची बोरे वेचत असताना अचानक त्यांचा तोल गेल्याने त्या विहिरीत पडल्या त्यांना पोहता येत नसल्याने त्यांनी आरडाओरडा केला परंतु शेजारी असणारे लोक मंगळवार आठवडा बाजार असल्याने बाजारांसाठी उटगी गावात गेले होते.दरम्यान त्यांचा मुलगा बाजार करून घरी आला असता, त्याची आई घरी न दिसल्यामुळे त्याने शोधाशोध केली असता विहिरीत त्यांचा मृतदेह आढळूंन आला. उमदी पोलिसांकडून मृत्तदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणी करण्यात आली.अधिक तपास जमादार भोसले हे करत आहेत.





