वृद्धांना खोकला, दमा, संधिवाताचा त्रास वातावरणातील बदल ठरतोय घातक : काळजी घेण्याची गरज

0

जत,(का.प्रतिनिधी):
हिवाळा लागला की तरुणांमध्ये उत्साह असतो. पण वृद्धांसाठी हे अच्छे दिन नसतात. त्यामुळे जत तालुक्यातील 25 टक्के वृद्धांना या दिवसांत खोकला, कप, दमा, संधिवात व श्‍वासोच्छवास या आजाराचा त्रास सहन करावा लागतो. वेळीच उपचार न केल्यास या आजाराचे इतर आजारामध्ये रुपांतर होऊ शकते व मृत्यूसुद्धा येऊ शकतो, असे तज्ज्ञ डॉक्टरांचे मत आहे.
वातावरणात अचानक बदल झाल्यामुळे विषाणूजन्य तापाने रुग्ण फणफणतो आहे.खासगी रुग्णालयासह शासकीय रुग्णालयात बाह्य व आंतर रुग्णांची संख्या हाऊसफुल्ल आहे.
वृद्ध रुग्णांना या दिवसांत पॅरालिसीस या भयंकर आजाराची शक्यता बळावते.या वयात त्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्याने त्यांच्यावर इतर आजाराचे आक्रमण होत असल्याचे डॉक्टरांचे मत आहे.वृध्दांची प्रतिकारक्षमता कमी असल्याने त्यांना आजाराची लक्षणे दिसू लागताच त्यावर उपचार करण्याची गरज असते. याकडे दुर्लक्ष केल्यास दुखणे बळावू शकते. अचानक बदललेल्या वातावरणामुळे वृद्धांची श्‍वसननलिका थंडीमुळे आकुंचन पावते. त्यामुळे इन्फेक्शन होऊन खोकला वाढतो. अशी लक्षणे आढळल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणे अनिवार्य आहे. वृद्धांची रोगप्रतिकारशक्ती कमी असते. त्यामुळे व्हायरल इन्फेक्शन त्यांना लवकर होतो. ज्यांना मधुमेह व उच्च रक्तदाबाचा आजार आहे. नियमित तपासणी करून कंट्रोल ठेवणे गरजेचे आहे.खोकला, दमा, सर्दी, कफ, संधीवात झाल्यास त्वरित डॉक्टरांकडे जावे.सकाळी थंडीमध्ये बाहेर पडू नये. ऊबदार कपड्याचा वापर करावा.मधुमेह व रक्तदाब वाढल्यास नियमित तपासण्या करून त्यावर नियंत्रण मिळवावे. मधुमेह नियंत्रणात ठेवणे गरजेचे वृद्धांना पॅरॅलिसीसचा झटका येऊ शकतो. त्यामुळे मधुमेह व रक्तदाबाच्या रुग्णांना त्रास वाढल्यास ताबडतोब तज्ज्ञ डॉक्टरांकडे जाऊन नियमित तपासण्या करणे गरजेचे आहे. तेव्हाच त्यावर नियंत्रण ठेवणे शक्य होईल. 

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.