पुन्हा एका कंपनीच्या फायबर केबल साठी खड्डे पाडण्याचे काम सुरू

0

जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील सध्या एका कंपनीच्या फायबर केबल टाकण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी पुन्हा रस्त्यावरून चरी पाडून खड्डे तयार करण्याचे काम सुरू आहे. सहा महिन्यापुर्वी अशाच एका कंपनीच्या फायबर केबल साठी पाडलेले खड्डे अद्याप मुजविले नसताना दुसऱ्या कंपनीच्या फायबर केबल साठी चरी काढण्यात येत आहेत. याकडे मात्र वरकमाईने वाकलेले संबधित विभागाचे अधिकारी लक्ष द्यायला तयार नाहीत.

जत तालुक्यात आतापर्यत तिसऱ्या खाजगी कंपनीच्या फायबर केबल साठी रस्त्याची मोडतोड करण्यात येत आहे. कुठेही कशाही चरी पाडण्यात येत आहेत. त्या कशीही मुजविल्या जातात. अगदी महिन्यात त्या चरीच्या ठिकाणचा भाग दबला जाऊन जिवघेणे खड्डे बनतात. काम चालू असेपर्यत संबधित ठेकेदार व्यवस्थित करू देतो म्हणून आश्वासन देतात. काम पुढे गेले की पुन्हा खड्ड्याने अपघात घडतात. रस्त्याच्या चरीसाठी संबधित कंपनीकडून बांधकाम विभाग, पंचायत समिती,ग्रामपंचायती कडे रस्त्याच्या दुरूस्थीसाठी पैसे जमा केले जातात. त्यामुळे त्यांना कसेही रस्ते फोडण्याचा परवाना दिला जातो. चरी पाडून केबल टाकत चरी कशाही मुजविल्या जातात.कालातंराने चरीच्या ठिकाणी खड्डे बनतात. त्यांचे दुरूस्थीचे उत्तरदायित्व असणारा विभाग याकडे डुकूनही बघत नाही.यापुर्वीच्या खड्ड्याने अपघात होऊन अनेकांनी जिव गमाविले आहेत, काहींना अपगंत्व आले आहे. सहा महिन्यापुर्वी एका कंपनीने पाडलेले खड्डे आजही तसेच आहेत. तोवर आता दुसऱ्या कंपनीच्या फायबर केबलसाठी खड्डे पाडण्याचे काम सुरू आहे. रस्ते कसेही फोडले जात आहेत. मुजविलेल्या ठिकाणी आता खड्ड्याची मालिका तयार झाली आहे. तंत्रज्ञानाची कास धरताना नाहक किती जीव घेणार? असा संतप्त सवाल नागरिकांतून व्यक्त होत आहे.

Rate Card

डफळापर ता. जत येथे मोबाईल कंपनीने केबल टाकण्यासाठी फोडलेल्या रस्ता आता जिवघेणा बनला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.