…पुन्हा जतच्या मतदारांचा कॉग्रेस नेते विक्रम सांवत यांच्यावर विश्वास कायम

0
Rate Card

जत,प्रतिनिधी : जत नगरपालिकेच्या निवडणूकीत ऐनवेळी शिंदे गटाचे 6 नगरसेवकांना कॉग्रेसमध्ये प्रवेश देण्यात आला. तेव्हापासून विरोधी पक्षाकडून कॉग्रेसला घेरण्यात आले. उमेदवारी देण्यापासून अडथळ्याची शर्यत भेदत कॉग्रेस नेते विक्रम सांवत यांनी कॉग्रेसचा पहिला थेट नगराध्यक्ष व निवडून आणण्याची किमया साधली. त्यामुळे पुन्हा एकदा जतच्या मतदारांचा सांवत यांच्यावर विश्वास कायम असल्याचे सिध्द झाले आहे.

ग्रामपंचायतीपासून तत्कालीन कॉग्रेसचा गट असलेल्या सुरेश शिंदे यांची एकहाती सत्ता होती. ती तब्बल तीन दशके कायम राहिली. नगरपरिषद स्थापनेनंतर झालेल्या पहिल्या निवडणूकीत मात्र शिंदे गटाला कॉग्रेसचे दुसरे नेते विक्रम सांवत यांनी आवाहन दिले. पहिल्याच निवडणूकीत आ. जगताप, शिंदे सांवत गट अशा तिंरगी झालेल्या लढतीत सांवत गटाने प्रथमच 7 जागा जिंकत धमाक्यात नगरपरिषदेत प्रवेश केला.मात्र त्यांना प्रांरभी बहुमत मिळविता आले नाही. देश,राज्यातील समिकरणे बदलल्या नंतर सांवत व शिंदे गट एकत्र येत नगरपरिषदेत सत्तेत आले. पहिल्या निवडणूकीत स्वच्छ व मनमिळावू व्यक्तिमहत्व असलेल्या सांवत यांच्यावर जत शहरातील जनतेनी विश्वास दाखवत भरभरून मते दिली. त्यामुळे जत शहर सांवत यांचा बालेकिल्ला झाला होता. त्यानंतर झालेल्या अनेक निवडणूकीत शहरातील मतदारांनी सांवत यांच्यावर विश्वास ठेवत मतदान केले.

यंदा नगरपरिषदेच्या दुसऱ्या पंचवार्षिक निवडणूकीत निवडणूकी आधी सांवत गट मजबूत वाटत होता. मात्र ऐनवेळी शिंदे गटाचे सहा विद्यमान नगराध्यक्ष, उपनराध्यक्ष, नगरसेवक कॉग्रेस मध्ये आल्याने जुने इच्छूंक नाराज झाले. नव्याने आलेल्यांना उमेदवारी दिल्याने काही प्रभागात बंडखोरी झाली. त्यामुळे कॉग्रेसच्या जागा घटल्या. मात्र कॉग्रेसचा पहिल्या लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून शुंंभागी बन्नेनावर निवडून आल्या आहेत.शिवाय कॉंग्रेस मित्रपक्षाचे 7 नगरसेवक विजयी झाले आहेत. या निवडणूकीत प्रथमपासून भष्ट्राचाराच्या मुद्यावर कॉग्रेसला सत्ताधारी भाजप व राष्ट्रवादी कॉग्रेसकडून घेरण्यात आले होते. भष्ट्राचारी नगरसेवकांना कॉग्रेस तिकिट दिल्याचे आरोप झाले. प्रचारादरम्यान दोन्ही बाजूकडून एकमेकांची शकले काढण्यात आली.  प्रांरभी कॉग्रेस काही प्रमाणात मागे असल्याची चर्चा झाली. मात्र शहरात राजकारणातील विनर असलेले सांवत थेट प्रचारात सक्रीय होताच शहरातील हवा बदलली. पहिल्या टप्यात आघाडीवर असलेल्या भाजप उमेदवारांला मागे टाकत त्यांनी कॉग्रेसच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शुंंभागी बन्नेनावर 

यांना निवडूूून आणले. त्यामुळे शहरात सांवतच किमयागार असल्याचे सिध्द झाले. मतदारांनी सर्व समिकरणाचा सर्वोत्तपरी विचार करत कौल दिला आहे.मात्र गत पालिका निवडणूक ते दुसऱ्या पंचवार्षिक निवडणूकीत पर्यत जत शहरातील जनतेनी सांवत यांच्यावर असणारा विश्वास कायम ठेवला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.