जतेत पुन्हा त्रिशंकू कौल कॉग्रेसच्या शुंभागी बन्नेनावर नगराध्यक्ष ; भाजप 7,कॉग्रेस 7, राष्ट्रवादी 6: सात विद्यमान नगरसेवक पराभूत

0

जत,प्रतिनिधी : जत नगरपालिकेची मतमोजणी झाली. मतदारांनी पुन्हा त्रिशंकू कौल दिला नगराध्यक्ष कॉंग्रेसच्या शुंभागी बन्नेनावर विजयी झाल्या,त्याच्या नजिकच्या प्रतिस्पर्धी भाजपच्या डॉ. रेणुका आरळी यांचा 178  मतांनी निसटता पराभव स्विकारावा लागला. असून कॉग्रेस 7,भाजप 7, राष्ट्रवादी 6 असे पक्षीय बलाबल मिळाले आहे.

विद्यमान सात नगरसेवकांचा पराभव झाला तर दोन विजयी झाले. त्यापैंकी विद्यमान नगरसेवक असणाऱ्या शुंभागी बन्नेनावर नगराध्यक्ष झाल्या तर नगराध्यक्ष इकबाल गंवडी पुन्हा नगरसेवक म्हणून निवडून आले.भैय्या कुलकर्णी, महादेव कोळी, परशूराम मोरे,गिरमल कांबळे,मंदागिनी बेंळूखे,माया साळे,लक्ष्मीबाई चव्हाण,भैरू माळी हे विद्यमान नगरसेवक तर शारदा कुंभार यांचे पती पापा कुंभार यांना 9 मतांनी पराभव स्विकारावा लागला.काही अपक्षाने पक्षाच्या अधिकृत्त उमेदवारांचे गणित बिघडविले.

पहिल्या फेरीपासून अत्यंत अटीतटीने झालेल्या मतमोजणीत प्रत्येक फेरीनुसार पारडे खालीवर झुकत होते. आठ प्रभागात 3 फेऱ्या तर दोन प्रभागात 4 फेरी झाल्या. पहिल्या फेरीपासून कॉग्रेसच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार बन्नेनावर पुढे होत्या. त्या अखेरपर्यत आघाडीवर राहिल्या. निर्यायक झालेल्या प्रचार यंत्रणेत कॉग्रेस नेते विक्रम सांवत, आ. विलासराव जगताप, व राष्ट्रवादी माजी सभापती सुरेश शिंदे यांची पतिष्ठा पणाला लागली होती. टोकाचा प्रचार व एकहाती सत्ता देण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र मतदारांनी पुन्हा त्रिशंकू कौल दिला आहे. त्यामुळे पालिकेचा कारभार करताना पुन्हा अडचणीचा अडचणीची शर्यत लागणार आहे. राष्ट्रवादी व भाजप एकत्र येत बहुमत करू शकतात. नगराध्यक्ष कॉग्रेस व सत्ता भाजप व राष्ट्रवादी यांच्याकडे राहणार आहे.

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.