मतदारांचा कौल मान्य :डॉ. रेणुका आरळी

0

जत,प्रतिनिधी : जत नगरपालिकेच्या निवडणूकीत भाजपकडून डॉ. रेणुका आरळी थेट नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून निवडणूक लढविली. त्यात मला काटावर पराभूत व्हावे लागले. आमच्या काही प्रभागातील यंत्रणा कमी पडल्या. कार्यक्रर्त्याची उणिव भासली. आम्ही जत शहराच्या विकासाच्या मुद्यावर जनतेसमोर गेलो. जतच्या जनतेला न्याय द्यायचा होता. म्हणून निवडणूक लढविली. त्यात प्रथमच आम्ही थेट राजकीय मैदानात उतरलो होतो. आ. विलासराव जगताप,मंत्री, भाजप नेते, व माझे पती डॉ. रविंद्र आरळी यांनी कष्ठ घेतले. प्रत्येक मतदारांच्या घरापर्यत पोहचून आम्ही मतदारांना आवाहन केले होते. मतदारांनी मोठे प्रमाणात मतदान केले. मात्र विजयापर्यत पोहचण्यास ते कमी पडले. ज्या नेते, कार्यकर्ते, मतदारांनी आमच्या वर विश्वास दाखवून मतदान केले, त्याच्यांसाठी आम्ही सदैव्य कठीबंध्द आहोत. जनतेचा कौल मान्य आहे. भविष्यात विकासाच्या मुद्यावर आमचे विजयी उमेदवारांना सहकार्य राहिल.

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.