जत नगरपालिकेच्या निवडणूकीसाठी प्रशासन सज्ज 33 पथके,तीन भरारी पथक, स्टॅटीक सर्व्हेलन्स टीम द्वारे वॉच ; 24 हाजार 561 मतदार हक्क बजावणार

0
9

जत,प्रतिनिधी : जत नगरपालिकेच्या निवडणूकीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. 198 कर्मचारी,42 पोलिस अधिकारी,कर्मचाऱ्यांकडून निवडणूक प्रक्रिया राबविली जाणार आहे. शहरातील 10 प्रभागातील थेट नगराध्यक्ष व वीस नगरसेवकांसाठी  24561 मतदार मतदान करणार आहेत. त्यात 11853 पुरूष,12707 महिला मतदारांचा समावेश आहे. आज रविवार सकाळी 7.30 ते सायं 5.30 वाजेपर्यत मतदान वेळ आहे.प्रत्येक मतदान केंद्रावर एक केंद्राध्यक्ष,3 मतदान अधिकारी, एक शिपाई,एक पोलिस कर्मचारी नियुक्त केले आहेत.अशा 33 पथकाद्वारे मतदान प्रक्रिया होणार आहे. आचारसंहिता कडक अंमलबजावणी वर लक्ष ठेवण्यासाठी तात्काळ कारवाईसाठी तीन भरारी पथकाचा वॉच ठेवण्यात आला आहे. शहरा बाहेरून शहरात येणाऱ्या ठिकाणावर्ती स्टॅटीक सर्व्हेलन्स टीम नेमण्यात आली असून अवैद्य मद्य वाहतूक, मतदारांना प्रलोभनासाठी वाटपासाठी येऊ शकणाऱ्या भेट वस्तूवर देखरेख ठेवण्याचे काम हे पथक करेल.

कोणत्याही दडपणाशिवाय मतदारांनी लोकशाहीच्या संवर्धनासाठी सद् विवेक बुध्दीने मतदान करावे.मतदारांचे नाव कोणत्या यादित आहे,अनुक्रंमाक काय आहे यांच्या माहिती देणाऱ्या वोटर स्लिप मतदारांना वितरित करण्यात आल्या आहेत. निवडणूकीसाठी दहा प्रभागातून 20 जागाकरिता 76 उमेदवार, तर थेट नगराध्यक्ष पदासाठी 4 उमेदवार निवडणूक लढवित आहेत. नगराध्यक्ष पदासाठी एक व प्रभागातील नगरसेवक पदासाठी दोन अशी तिन मते द्यावयाची आहेत.मतपत्रिकेवरील उमेदवारा पैंकी कोणताही पर्याय योग्य वाटत नसल्यास मतदार नाटोचा पर्ययाचा अवलंब करू शकतात.तहसिल कार्यालया समोरील गोडावून मधून सर्व यंत्रणा राबविली जात आहे. तेथेच सोमवारी ता. 11ला सकाळी दहा वाजलेपासून मतमोजणी सुरू होणार आहे. प्रत्येक प्रभागाच्या मतमोजणी साठी स्वतंत्र टेबलाची व्यवस्था केली आहे. मतदारांनी आपला हक्क बजावून लोकशाही बळकंट करावी. उमेदवार व राजकीय पक्षांनी आचारसंहिता व कायदा सुव्यवस्थेचा भंग होणार नाही दक्षता घ्यावी असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी यांनी केले आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here