प्रतिष्ठा पणाला नगरपालिका निवडणूक :आज मतदान ; सर्व नितीचा वापर ; कॉग्रेस,राष्ट्रवादी,भाजप तुल्यबंळ लढत

0

प्रतिष्ठा पणाला

नगरपालिका निवडणूक :आज मतदान ; सर्व नितीचा वापर ; कॉग्रेस,राष्ट्रवादी,भाजप तुल्यबंळ लढत

 जत,प्रतिनिधी : जत नगरपालिकेच्या  दुसऱ्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी आज मतदान होत आहे. हि निवडणूक राज्य,जिल्हा,नगरपालिका सत्ताधारी पक्षाने प्रतिष्ठेची केली आहे.अगदी तालुका पातळीवर नेते थेट मैदानात उतरल्याचे चित्र होते. यात भाजपचे आमदार विलासराव जगताप,वंसतदादा आघाडीचे माजी सभापती सुरेश शिंदे,कॉग्रेसचे जिल्हा बँक संचालक विक्रम सांवत यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून यातून निवडणून येणाऱ्या पक्षाला किंबहुना गटाला भविष्यात जत शहरासह तालुक्यातील सत्ता मजबूत करता येणार आहे.
नगरपालिका स्थापनेपासून सर्वच राजकीय पक्षाने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.हि दुसरी पंचवार्षिक निवडणूक होत आहे.
ग्रामपंचायत असताना जतचे माजी सभापती सुरेश शिंदे यांची निर्विवाद सत्ता होती. नगरपालिका स्थापनेनंतर झालेल्या पहिल्या निवडणूकीत मात्र;त्यांच्या निर्विवाद सत्तास्थानाला कॉग्रेसचेच जिल्हा बँक संचालक विक्रम सांवत यांनी परिवर्तन पँनेलने मोठे आवाहन दिले.त्याचबरोबर भाजपचे आमदार विलासराव जगताप यांनीही आपले उमेदवार मोठ्या ताकदीने मैदानात उतरल्याने जत नगरपालिका निवडणूकीत मोठी चुरस निर्माण झाली होती.ती आजतागायत तशीच आहे. तत्कालीन निवडणूकीत कॉग्रेसचे नेते विक्रम सांवत यांनी मोठी झूंज देत सात उमेदवार निवडणूक आणले,सुरेश शिंदे गटाला आठ जागा मिळाल्या तर तत्कालीन राष्ट्रवादीचे तीन उमेदवार विजयी झाले.विक्रम सांवत यांच्या वाढत्या प्रभावाला रोकण्यासाठी त्यावेळी सुरेश शिंदे यांनी जगताप यांच्याशी जुळवून घेत त्यांचा दोन उमेदवारासह सत्ता राखली.सुरेश शिंदे यांनी बरीच गणिते मांडत कट्टर विरोधक आ.विलासराव जगताप यांच्यासह काटावर सत्ता मिळविता आली,पुढे लोकसभेच्या निवडणूकीत कॉग्रेसच्या दोन्ही गटाचे मनोमिलन होऊन कॉग्रेसचा काही काळापुरता गट एकसंग झाला व सत्तेत विक्रम सांवत गटाला वाटा देण्यात आला.पुढे आमदारकी निवडणूकीत पुन्हा कॉग्रसचे दोन्ही गट दुंभगले,ते आजही स्वंतत्रच आहेत. मात्र सुरेश शिंदे गटाचे नगरसेवक आपल्या गटाकडे खेचत सांवत गटाने कुरखोडी केली. त्यामुळे नगरपालिकेची सुत्रे अखेरला विक्रम सांवत गटाकडे राहिली. शिंदे गटाला दगाफटका झाल्याने त्यांनी निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांची हकालपट्टी करत सर्व उमेदवार नवे उभे केले आहेत.दुसरीकडे सांवत गटाकडून शिंदे गटातून कॉग्रेसमध्ये आलेल्या सर्व नगरसेवकांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे काही इच्छूंक नाराज आहेत.आमदार विलासराव जगताप यांनी नगराध्यक्ष पदासह सर्व सक्षम उमेदवार उभे करून तुल्यबंळ आवाहन उभे केले आहे. त्यामुळे गेल्या एकवीस दिवसापासून तोफा धडाडल्या आहेत. आरोप पत्यारोपाने राजकारण वेगळा वाटेने गेले आहे. नवे ,जूने,भष्ट्राचार यावर जोराच्या टिका प्रचार सभेत झाल्या आहेत. तिन्ही तुल्यबंळ पक्षाकडून विजयासाठी सर्वोत्तपरी प्रयत्न केले आहेत. काही बंडखोर व अपक्ष उमेदवारांनी ही टोकाचा प्रचाराने रंगत आणली आहे. काही अपक्ष निवडून येतील किंवा काही उमेदवारांचे गणित बिघडवितात का? हे महत्वपुर्ण ठरणार आहे.

 जत नगरपालिका भविष्यातील राजकारणाचा केंद्र बिंन्दू ठरणार असल्याने सर्वच पक्ष त्यांची सत्ता आपल्याच पक्षाकडे राहावी यासाठी जीव तोडून प्रचार करत आहेत.या सर्व प्रक्रियेत मात्र तालुक्यातील ताकदवान नेत्यानी प्रतिष्ठा कायम ठेवण्यासाठी प्रचार यंत्रणा स्वत:च्या ताब्यात घेऊन आपलाच उमेदवार निवडणून यावा यासाठी रात्रीचा दिवस करत आहेत.

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.