मोरबगीत गांजा शेतात छापा : तीन लाखाचा मुद्देमाल जप्त

0

      

उमदी,वार्ताहर ;मोरबगी (ता.जत) येथील गांजा शेतीवर उमदी पोलिसांनी छापा टाकून  दोन लाख 98 हाजार रुपये किंमतीचा गांजा जप्त केला.

याबाबत पोलिसाकडुन मिळालेली माहिती अशी की, मोरबगी (ता.जत )येथील निलाप्पा अर्जुन कारकल (वय-55, रा मोरबगी)यांच्या घरासमोरील शेतातील मक्याच्या पिकात गांजाची लागवड केली असल्याची माहिती मिळाली होती.त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी नागनाथ वाकडे यांच्या मार्गदर्शनाखाली उमदी पोलीस ठाण्याचे नूतन सा. पोलीस निरीक्षक भगवान शिंदे, उपनिरीक्षक प्रवीण संपागे यांनी आपल्या पथकासह सोमवारी रात्री अकराच्या सुमारास घटनास्थळी छापा घातला. त्यात गांजाची हिरवी व वाळलेली झाडे आढळून आली.ती ताब्यात घेतली आहे. छापा पडताच आरोपी पसार झाला आहे.याप्रकरणी उमदी पोलिसात गुन्हा दाखल असून अधिक तपास भगवान शिंदे करीत आहे.

चौकट

Rate Card

गत वर्षभरातील गांज्याविरोधी मोठी कारवाई

उमदी पोलिस ठाण्याअतर्गंत मोठ्या प्रमाणात अवैद्य धंदे सुरू आहेत. गांजा,अवैद्य वाळू,प्रवाशी वाहतूक, मटका या सारख्ये अवैद्य धंदे फोफावल्याचे आरोप सतत होत आहेत. त्याअानुषांने नव्याने आलेले सा. पोलिस निरिक्षक भगवान शिंदे यांच्या या मोठ्या कारवाई अवैद्य धंद्यांना चाफ बसणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.