राष्ट्रवादी उमेदवारांच्या प्रचाराचा झंजावात

0

जत,प्रतिनिधी : जत नगरपालिकेच्या निवडणूकीत राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांनी आक्रमक व झंझावती प्रचाराचा धमाका सुरू केला आहे. पालिकेत पक्षाला स्पष्ट बहुमत मिळेल असा दावा,  राष्ट्रवादीचे नेते सुरेशराव शिंदे सरकार यांनी केला.  

Rate Card

जत नगरपालिकेत भ्रष्ट कारभार करून शहराची वाट लावलेल्या नगरसेवकांची हकालपट्टी करण्याचा ऐतिहासिक निर्णय सुरेशराव शिंदे सरकार यानी घेतला. नवे चेहरे,  चारिञ्यवान, व लोकमत असलेले उमेदवार दिले. शहरातील समस्या व गतवेळच्या कारभाराने वैतागलेले नागरिक राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या पाठिशी असल्याचे शहरभरचे चित्र आहे. प्रत्यक्षात अतिंम प्रचार सुरू आहे. पाच दिवसावर मतदान आल्याने सर्वच यंत्रणा जोमाने कामाला लागल्या आहेत.राष्ट्रवादीचे जतचे आक्रमक नेते माजी सभापती सुरेश शिंदे यांनी कोपरा सभा, मतदारांशी थेट संपर्क साधत प्रचाराचा धडका लावला आहे. उमेदवारांनी घरंघर पिंजून काढले आहे. जतचा विकास साधायचा असेल तर राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांना विजयी करा असे आवाहन करण्यात येत आहे. जतच्या जनतेविषयी तळमळ असणारे सुरेश शिंदेच जतचा जनतेला अभिप्रेत असलेल्या विकास साधतील असे यावेळी त्यांच्या समर्थंकानी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.