कॉग्रेसला नगराध्यक्षासह स्पष्ट बहुमत मिळेल: नाना शिंदे

0

जत,प्रतिनिधी : जत नगरपालिकेत एकाधिकारशाही,व विकास कामात अडकाटी घालणाऱ्यांना यंदा मतदार कात्रजचा घाट दाखवतील. कॉग्रेसला नगराध्यक्षासह स्पष्ट बहुमत मिळेल. असा विश्वास नगरसेवक नाना शिंदे यांनी व्यक्त केला.

Rate Card

शिंदे म्हणाले, शहरात आम्ही सर्वत्र फिरत आहोत. आमचे नेते विक्रम सांवत यांच्या नेतृत्वाखाली उभे असलेले कॉग्रेसचे सर्व उमेदवारांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. भष्ट्राचार, व विकासकामे झाली नाहीत म्हणून सभात सांगणाऱ्या स्वंयघोषित नेत्यांनी विकास कामांना स्वार्थासाठी अडथळे आणले. त्यामुळे जत विकासाला मर्यादा पडल्या आहेत.शहरातील जनतेचा महत्वाचे आरणारे मुबलंक व स्वच्छ पाणी पुरवठा, खड्डे मुक्त रस्ते व स्वच्छता या समस्या प्राधान्याने सोडविण्यासाठी आम्ही स्वतंत्र आराखडा तयार केला आहे. सर्व कामे लोकांच्या हितासाठी होतिल. विकास कामाचे अनुभव असलेले उमेदवार कॉग्रेसकडून दिले आहेत. थेट रस्त्यावर उतरत जनतेच्या सुख:दुखात धावून जाणाऱ्या उमेदवारीनां कोणत्याही आमिषाला बंळी न पडता जतच्या भविष्यासाठी बहुमताने विजयी करा असे आवाहन शेवटी शिंदे यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.