पुकळे उद्योग समुहाच्या अग्रो इंडस्ट्रीजचा बुधवारी शुभारंभ सोहळा शेतमालावर प्रक्रिया उद्योगामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादीत मालाला योग्य दर मिळणार

0

डफळापूर,वार्ताहर : डफळापूर येथील ग्रामपंचायत सदस्य पोपटराव पुकळे यांच्या पुकळे उद्योग समुहातील पहिल्या अद्यावत मशनिरीचा उद्धाटन सोहळा 6 डिंसेबरला होत आहे. राजकारण करत कायम आपल्या भागात उद्योग उभारले पाहिजेत,आपल्या भागातील बेरोजगार तरूणांच्या हाताला काम मिळाले पाहिजे.आपल्या 

भागातील काबाडकष्ठ करून शेतीतून धान्य पिकविणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळाला पाहिजे. त्यासाठी शेत मालावर प्रक्रिया उद्योग उभारणी गरज यासाठीची कायम तळमळ असलेल्या पोपटराव पुकळे यांच्या पहिल्या उद्योग समुहतील “वृंध्दावन अग्रो इंडस्ट्रीज” डफळापूरकरांच्या सेवेत दाखल होत आहे. आपल्या परिसरातील परिस्थिती होणारे ज्वारी,बाजरी,कडधान्याचे उत्पादन या कच्चा मालाच्या अनुषंगाने पुकळे यांनी उद्योग उभारणी केली आहे. जत तालुक्यातील उत्पादीत धान्यावर प्रक्रिया करून सर्व प्रकारच्या डांळी उत्पादन,तसेच मक्का चुन्नी, गोळीपेंड अशा पशुखाद्याचे उत्पादन वृंध्दावन अग्रो इंडस्ट्रीज मधून होणार आहे. डफळापूर-अंनतपूर रोडनजिक पुकळे नगरमध्ये हा उद्योग उभारण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यातील मशनिरीतून उत्पादन सुरू होणार आहे. डफळापूर सारख्या ग्रामीण भागातून पुकळे यांचा या उद्योगातून प्राथमिक दहा- वीस तरुणांना काम उपलब्धं होणार आहे. शिवाय परिसरातील दुध उत्पादक शेतकऱ्यांना पशुखाद्याचे गोळीपेंड, चुन्नी योग्य दरात उपलब्धं होत आहे. कायम नाविऩ्याची कास धरलेले पोपटराव पुकळे यांचा या माध्यमातून उद्योग क्षेत्रात प्रवेश होत आहे. सध्यस्थितित पुकळे उद्योग समुहात सर्व प्रकारच्या डाळीवर प्रक्रिया करून उच्च दर्जाच्या डांळीचे उत्पादन व विक्री, उच्च दर्जाच्या मक्का चुन्नी, गोळीपेंडचे उत्पादन व विक्री, शिवाय येथेच सर्व प्रकारचा शेतमाल योग्य दरात खरेदी व विक्री होणार आहे. परिसरातील शेतकऱ्यांना यामुुळे उत्पादीत धान्यांना योग्य दर मिळणार आहे. शिवाय प्रक्रिया उद्योगामुळे कडधान्यांनाही योग्य भावात विक्री करणे शक्य होत आहे. 

Rate Card

अशा डफळापूरच्या वैभवात भर घालणाऱ्यांना पुकळे यांच्या नव्या उद्योग विश्वासाचा शुभारंभ सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उद्या बुधवार ता. 6 डिंसेबर 2017 ला सकाळी 11.00 संपन्न होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.