व्यसनमुक्त व्हा गड्यांनो,जीवन आहे क्षणभंगुर,आस्वाद घ्या गड्यांनो मोहन माळी इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्याच्या व्यसनमुक्त जीवन पदनाट्यानी कवटेमहांकाळ दुंमदुमले.

0

व्यसनमुक्त व्हा गड्यांनो,जीवन आहे क्षणभंगुर,आस्वाद घ्या गड्यांनो 

मोहन माळी इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्याच्या व्यसनमुक्त जीवन पदनाट्यानी कवटेमहांकाळ दुंमदुमले.

Rate Card

अलकूड ; अभिनव फौंडेशन संचलीत मोहन माळी इंटरनॅशनल स्कूल व्यसनमुक्त व्हा,स्वतला: देशाला :व्यसनमुक्त करा अशा आषंयाचे विध्यार्थ्यांनी कवठेमहांकाळ शहरातील युवावाणी चौक,म्हसोबागेट,

तहसीलदार कार्यालय, पी.व्ही .कॉलेज,स्टँड समोर पथनाट्य सदर करण्यात आले. यावेळी तहसिलदार शिल्पा ठोकळे ह्या उपस्थित होते. त्यांनी मुलांनी सादर केलेल्या या व्यसनामुक्ती जागृत्तीचे कौतुक केले. व्यसनमुक्त व्हा गड्यांनो,व्यसनमुक्त व्हा, जीवन आहे क्षणभंगुर त्याचा आस्वाद घ्या गड्यांनो व्यसनमुक्त व्हा,गुटका,तंबाखु,सिगरेट,सोडा कर्करोगाला आमंत्रण देऊ नका या,गावटी रम,व्हिस्कीची नशा,शरीराची करून टाकेल दशा-दशा,टीबी रोगाला आमंत्रण देऊ नका या गड्यांनो व्यसनमुक्त व्हाकोकेन ,अफू ,गांजा-चरस या मादक द्रव्यांच्या आहारी जाऊ नका.देशाचे भावी आधार तुम्ही गड्यांनो व्यसनमुक्त व्हा,शत्रूची हि चाल तरुणांना नष्ठ करण्याची बरबाद होतात अनेक कुटुंबे या व्यसनापाई कुटुंब,बरबाद झाली कि देश  बरबाद व्हायला वेळ लागत नाही, गड्यांनो तुम्हीच विचारा आपल्या मनाला आपण निर्धार करा पक्का, अशा घोषणांनी कवटेमहांकाळ शहर दुमदुमवून गेला होता. व्यसनामुळे अनेक कुंटुबे उध्वस्त झाली आहे. अनेक मुलांचे 

शैक्षणापासून वंचित रहावे लागत आहे. या व्यसनामुळे कुणाचेही चांगले झाले नाही.त्यांचा संदेश आमच्या संस्थेच्या चिमुकल्याच्या सादर करून प्रबोधनाचे काम सामाजिक बांधिलकी म्हणून केले आहे.असे यावेळी संस्थापक मोहन माळी यांनी सांगितले.शीतल पाटील,अपर्णा महिमकर,भाऊसाहेब शिंदे,अमर पाटील, नारायण मोठे,पांडुरंग पाटील यांनी कष्ठ घेतले.प्राचार्य कविता मेहरा,सचिन कदम,मॅनेजर सचिन चौगुले यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.