गुरूबसव विद्यामंदिर सुवर्ण महोत्सवाचा सांगता सभारंभ संपन्न
संख,वार्ताहर;संख येथील श्री. गुरूबसव विद्यामंदिर ज्यु.कॉलेजच्या सुवर्ण महोत्सव निमित्त तिसऱ्या दिवशी विविध कार्यक्रम संपन्न झाले.महोत्सावाचां सांगता सभारंभ संपन्न झाला. जत पुर्व भागातील या संस्थेला पन्नास वर्ष पुर्ण झाले आहेत. त्यानिमित्त तिन दिवस विविध कार्यक्रमाने सुवर्ण महोत्सव संपन्न झाला.
यावेळी खा.संजय पाटील, आ.सुरेश खाडे,माजी सभापती आर.के.पाटील,अमृतानंद महास्वामी,संरपच मंगल रा.पाटील,व्याख्याते
दिपक शिदे,प्रा.जयसिंग एन.सांवत,(ताराराणी विद्यापीठ कोल्हापूर),डॉ.मदन बोर्गीकर,प्रकाश जमदाडे,महेश हिंगणे ,डॉ.गोविंद रावसाहेब पाटील,गुरूबसव पाटील सर,विजय बिरादार आदि मान्यवर उपस्थित होते.
संख येथील गुरूबसव विद्यामंदिर सुवर्ण महोत्सवानिमित्त उपस्थित आ.सुरेश खाडे यांचा सत्कार करताना माजी सभापती आर. के. पाटील व मान्यवर






