जत पालिकेची भाकरी फिरवा… पालकमंत्री सुभाष देशमुख ; भाजपला सत्ता देण्याचे प्रचार सभेत आवाहन

0

जत,प्रतिनिधी :जतला केंद्र,राज्य,व जिल्ह्यातून मोठा निधी आणून विकास करू. आलेल्या निधीत एक रुपयाही भष्ट्राचार होऊ देणार नाही. निधी फक्त जनतेच्या हितासाठी खर्च करण्यात येईल. जत नगरपालिकेतील सत्तेची भाकरी आता बदला नाहीतर ती करपेल असे प्रतिपादन सहकार तथा पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी केले. ते जत नगरपालिकेच्या निवडणूकीच्या भाजप प्रचाराच्या सभेत दिली.

ते थोरली वेस येथील जाहीर सभेप्रंसगी बोलत होते. यावेळी खा.संजय पाटील, जिल्हाअध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, आ.विलासराव जगताप,सुरेश खाडे,दिपक म्हैशाळकर शिंदे,मकंरद देंशपाडे, डॉ. रविंद्र आरळी,सभापती तम्मानगोंडा रवी,संजय कांबळे,अॅड. प्रभाकर जाधव,सरदार पाटील,चंद्रकांत गुड्डोडगी,नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉ. रेणुका आरळी, सर्व नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार आदि मान्यवर उपस्थित होते.

Rate Card

पालकमंत्री देशमुख पुढे म्हणाले,कॉग्रेस, राष्ट्रवादीचे जाहिरनाम्यात खिळ घालण्यात आली.असे म्हणण्यात आले. पंरतू खिळ कुणी घातली. तिस वर्षे सत्ता त्यांच्याकडेच होती. हा जनतेला फसविण्याचा प्रकार आहे.

मी रविवारी दिवसभर जत शहरात अनेक प्रभागात फिरलो,भष्ट्राचाराने अनेक नागरिक कंटाळले आहेत. आम्हाला नगरपरिषद नको ग्रामपंचायत करा अशा प्रतिक्रीया मिळाल्या.जतच्या महिलांना आर्थिक दृष्टा सक्षम करण्यासाठी उद्योग आणून जतच्या महिलाच्या हाताला काम देऊ.केंद्र व राज्य सरकार जनहित पाहून योजना आखत काम करत आहे.बेरोजगारी,हक्काची घरे,सिंचन योजना,जलयुक्त शिवार योजना आखून मजबूत राज्य करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सर्वत्र पारदर्शी कारभार करण्यासाठी भाजपचे हात बळकंट करण्यासाठी जतेत भाजपची सत्ता आणा.कोणत्याही आमिषाला बळी न पडता भष्ट्र सत्ता उलथवून टाका.भाजपने संस्कारी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार दिला आहे. वडीलापासून त्यांना वारसा आहे.

खा. संजय पाटील म्हणाले,गत निवडणूकीत कारभार दिलेल्या सत्ताधारी मंडळीनी विकास केला नाही. जनतेला वेटिस धरले. आमच्या उमेदवार सक्षम पर्याय भाजपने दिला आहे. सत्ताधारी मंडळीनी सगळ्यात कमिशन लाटले.जतच्या विकासासाठी भाजप केंद्र सरकारकडून म्हैशाळ सिंचन योजने,पुर्व भागासाठी कर्नाटकातून योजनेच्या कामा गती दिली आहे. रस्त्याला मोठा निधी आणला आहे. तालुक्यातील अनेक सत्ता दिली. तेथे विकास सुरू आहे. जत नगरपरिषदेवरही भाजपला सत्ता द्येऊन एकवेळ संधी द्या. तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त विकास साधू. शहरात निश्चित विकासाची गंगा आणू.जतच्या विकासासाठीही भाजपचे व्हिजन तयार आहे. जनतेनी विश्वास दाखवावा.

आ. विलासराव जगताप म्हणाले, विरोधी कॉग्रेस व राष्ट्रवादी कॉग्रेसच्या नगरसेवकांनी भष्ट्राचार केला आहे. गेल्या पाच वर्षात जतला लुटणाराला आता पुन्हा संधी देऊ नका,गत वेळची चुक सुधारून भाजपला मतदान करा,निश्चित परिवर्तन करू,भाजपने नगराध्यक्ष सह नगरसेवकांचे सक्षम पॅनेल आम्ही उभे केले आहे. आमचे सर्व उमेदवार विजयी होतिल. कॉग्रेसकडून भष्ट्राचाराची टोळी सामिल झाली आहे. भष्ट्र टोळीतीला एकाला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली आहे. ते जतचा विकास कसा करू शकेल असा सवाल आमदार विलासराव जगताप यांनी उपस्थित केला.पालिकेचा एकही सदस्य जिल्हा नियोजन मध्ये नसतानाही जिल्हा नियोजन मधून शहराला मोठा निधी दिला आहे. सत्ताधाऱ्यांनी त्या कामातही कमिशन खाले आहे. ही निवडणूक परिवर्तनाची नांदी आहे. 

जत येथील नगरपरिषदेच्या भाजपच्या प्रचार सभेत बोलताना पालकमंत्री सुभाष देशमुख बाजूस खा. संजय पाटील, आ. विलासराव जगताप, सुरेश खाडे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.