बाबा महाराज आश्रमास कर्नाटकच्या कन्नड सांस्कृतिक मंत्री श्रीमती उमाश्री यांची भेट

0

संख,वार्ताहर : गोंधळेवाडी ता.जत येथील तुकाराम बाबा यांच्या मठास कर्नाटक राज्याचे कन्नड व सांस्कृतिक मंत्री व विनोदी अभिनेत्री उमाश्री यांनी दिली सदिच्छा भेट दिली. तुकाराम बाबांनी आश्रमाच्या माध्यमातून सुरू केलेले उद्योगाबरोबर धार्मिक कार्याचे कौतुक केले.आश्रमाच्या वतीने तुकाराम बाबांनी मंत्री उमाश्री याच्या सत्कार केला.यावेळी अँड. बसवराज जिगजेनी, दत्ता सावळे आदी उपस्थित होते.

     यावेळी तुकाराम बाबाच्या बाबा बिसलरीच्या प्लॅंटला भेट देऊन पाहणी केली. येथे काम करत असलेल्या कामगारांशी संवाद साधला .तुकाराम बाबा यांनी विविध व्यवसाय उभे करून मिळणाऱ्या उत्पादनाच्या फायदा समाज कार्य करण्यास खर्च करत असले बद्दल त्याचे कौतुक केले.गोरगरीब लोकांना दवाखाना खर्च,गर्जूना घरे बांधून देऊन मदत केली असलेची उदाहरणे देऊन सांगितले.असे कार्य ग्रामीण भागात उभे करून बाबा महाराज यांनी वेगळा आदर्श घालून दिल्या आहे. त्याचे कार्य कौतुकास्पद असल्याचे उमाश्री यांनी सांगितले.

फोटो

गोधंळेवाडी येथील बाबा महाराज आश्रमास कर्नाटकच्या कन्नड सांस्कृतिक मंत्री श्रीमती उमाश्री यांची भेट देऊन पाहणी केली. यावेळी  त्याच्या सत्कार तुकाराम महाराज यांच्या हस्ते करण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.