राजकीय पक्षांनी कसली कंबर थेट नगराध्यक्ष निवडणूकींने पक्ष नेतृत्वाचा कस जत नगरपरिषद : सर्व समिकरणाची जुळवाजुळ ; पुन्हा तिन गट आमनेसामने

0

जत,प्रतिनिधी :जत नगरपरिषदेच्या निवडणूकीत नगराध्यक्षाची थेट जनतेतून निवड असल्याने स्वच्छ प्रतिमा असलेल्या चेहर्‍याला संधी मिळेल. परिणामी गैरप्रकारांनाही आळा बसेल. ‘अर्थपूर्ण’ व्यवहाराकडे लक्ष केंद्रित न करता विकासाभिमुख, लोकहिताच्या ठरावांना मंजुरी मिळेल. असे ठरावही मार्गी लागतील; मात्र त्यासाठी समाजातील नि:स्वार्थ, स्वच्छ प्रतिमांच्या व्यक्तींनी हेवेदाव्यांना तिलांजली देत एकत्र येणे गरजेचे आहे. नागरिकांनीही निष्कलंक व्यक्तींची मोट बांधण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. नेते, कार्यकर्त्यांचा लागणार कस ; नगरपरिषदेच्या पहिल्या निवडणूकीत तिंरगी सामना रंगला होता. त्यात सुरेश शिंदे, विक्रम सांवत, आ. विलासराव जगताप असे तुल्यबंळ नेत्यांनी रणागंण गाजविले. त्या निवडणूकीत शिंदे गट 8,सांवत गट 7,आमदार गट 3 असे समिश्र यश मिळाले होते. सर्वाधिक 9 उमेदवार निवडून आल्याने सुरेश शिंदे यांनी भाजपशी युक्ती करून सत्ता मिळविली मात्र सत्ताकारणात मोठा फेरफार होत कायम सत्ता नगरसेवकांनी मनाप्रमाणे तिन्ही गटाकडे झुकविली. शेवटी कॉग्रेसमध्ये प्रवेश केला. या घडामोडी सुरेश शिंदे यांच्याशी दगाफटका झाल्याने त्यांनी आक्रमक होत या निवडणूकीत नवे चेहरे आणत राष्ट्रवादी कॉग्रेसच्या माध्यमातून तुल्यबंळ आवाहन उभे केले आहे. दुसरीकडे विक्रम सांवत यांनी पाच वर्षात कॉग्रेसचा गट मजबूत करत शहरावर निर्विवाद वर्चस्व ठेवण्यासाठी रण पछाडले आहे. आमदार विलासराव जगताप यांनी भाजपकडून नगराध्यक्ष पदाच्या सक्षम उमेदवारांसह पँनेल उभे केले आहे. तिन्ही गटाकडून सत्ता मिळविण्यासाठी सर्वोत्तपरी प्रयत्न सुरू केले आहेत.नगराध्यक्षपदाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांचा कस लागला आहे. 

तर प्रचंड कसरत ;

नगराध्यक्षाची निवड थेट जनतेतून असल्याने राजकीय पक्षांना निवडणुकीत आपल्याच पक्षाचा नगराध्यक्ष निवडून येण्यासाठी वेगळ्या पद्धतीने परिश्रम करावे लागणार आहेत तसेच केवळ नगराध्यक्षपदाचा उमेदवार निवडून आणून फायदा होणार नसून, कारभार सुरळीत चालण्यासाठी व निर्णय तातडीने घेण्यासाठी जास्तीत जास्त सदस्य निवडून आणणेही गरजेचे राहणार आहे. नगराध्यक्ष एका पक्षाचा व नगर परिषदेत बहुमत दुसर्‍या पक्षाला मिळाले, तर नगर परिषदेत स्थिरता राहणार नाही. त्यामुळे नगर परिषदेच्या कामात अडथळा येऊ शकतो. प्रसंगी त्याचा परिणाम जनतेला नगर परिषदेकडून मिळणार्‍या सुविधा व विकासकामांवर होऊ शकतो, असे जाणकारांचे म्हणणे आहे. 

भाजप,कॉँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घमासान ;
केंद्र व राज्यात भाजपच्या नेतृत्वातील सरकार आहे. भाजप स्थानिक स्वराज्य संस्थेवर झेंडा फडकविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. प्रथम केंद्र व नंतर राज्यातील सत्ता हातून गेलेले काँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेस किमान स्थानिक स्वराज्य संस्थेची सत्ता तरी आपल्या हाती राहावी, यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे निवडणुकीत भाजप,कॉँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घमासान होणार आहे, असे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे. राजकीय पक्षांनी कसली कंबर समीकरणे बदलणार!जनतेतून नगराध्यक्ष निवडण्याच्या निर्णयामुळे पदासाठीचा होणारा घोडेबाजार, मक्तेदारी मोडीत निघेल, अशी शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करीत आहेत. विकासाची दिशा आणि समाजातील स्वच्छ प्रतिमा असलेल्यांनी एकत्र येऊन, राजकारणापेक्षा समाजकारण करणारा चेहरा नगराध्यक्षाच्या रूपात द्यावा, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे. स्वच्छ प्रतिमेच्या व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. त्यापैकी काहींनी विजयश्री प्राप्त करीत केली होती. ते नगरपालिकेच्या राजकारणात रममान झाले, तर काहींना हे राजकारणच न मानवल्याने ते प्रवाहाबाहेर फेकल्या गेले. नगराध्यक्ष पदाच्या थेट निवडीमुळे नगर परिषदांमधील राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे.  

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.