जतच्या विकासासाठी राष्ट्रवादी कॉग्रेसची बहुमताने सत्ता आणा; सुरेश शिंदे

0

जत,प्रतिनिधी ;कचरा उचलने,गटारीचा ठेका आपल्याच बगल बच्चांना देऊन लाखो रूपयाचा निधी ढापला.ठेक्याच्या माध्यमातून निकृष्ठ कामे करून शहराला लुटले.जनतेच्या त्यापैशातून महाबळेश्वरला जाऊन चैन व हौसमौज केली. त्यामुळे सतत सत्तेत राहण्यामागचे सत्य लोकांसमोर आले आहे. अशी टिका नगरपरिषदेच्या पहिल्या नगरसेवकांवर राष्ट्रवादीचे नेते माजी सभापती सुरेश शिंदे यांनी केली.नगरपरिषदेच्या प्रभाग 10 मधील उमेदवारांच्या प्रचारार्थ कोपरा सभा घेण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शबाना इनामदार, उमेदवार आप्पासाहेब कोळी,हेमलता महेश निकम, प्रा.हेमंत चौगुले, डॉ. पराग पवार, ए.डी. माने,राजू पट्टनशेट्टी, अंकुश भोसले,उत्तम चव्हाण, बाजी केंगार आदी उपस्थित होते.

शिंदे म्हणाले, निवडणूकीत पैसा लावून निवडून यायचे व पाच वर्षात जनतेला लुटायचे असा उद्योग काही मंडळीनी सुरू केला आहे. गत पाच वर्षात विकासाचा निधी बेफामपणे उधळून स्वता;चे हित बघितले आहे. लाखोची दर्जाहीन कामे करून निधी मिळविला.त्याच पैशातून काही नगरसेवकांना थंडी ताफ आला तर पाचगणी महाबळेश्वरला विश्रांतीसाठी जात होते. अशा नगरसेवकाची काय परिस्थिती आहे.एवढा पैसा आला कुठून? जनतेचा पैशावर ऐशोआराम करणाऱ्या आम्ही हाकलले 

Rate Card

शिंदे म्हणाले, शहरातील गटारी, शौच्छालयाची बांधकामे, रस्ता दुरूस्थी,मुरमीकरण, पेग्विन ब्लॉक बसविणे,गंर्धव ओढ्यातील मध्यवर्ती गटार,स्वच्छता, साहित्य पुरवठा अशा अनेक कामाचे ठेके आपल्या बगल बच्चांच्या नावावर घेतले. यात दर्जाहीन कामे करून मोठा डल्ला मारला. जनतेच्या पैशाची वारेमाफ उधळपट्टी केली. अशांना आता कात्रजचा घाट दाखवा. ऱाष्ट्रवादी कॉग्रेसचे स्वच्छ प्रतिमा असलेले लोकंमतातील उमेदवार आम्ही दिले आहेत. जतच्या भविष्यासाठी बहुमताने सत्ता द्या. असे आवाहन शेवटी शिंदे यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.