मिरवाड मधील विवाहितेचा संशयास्पद मुत्यू

0

जत,प्रतिनिधी;मिरवाड (ता.जत)येथील विवाहिता रुपाली बाजीराव सवदे (वय-25) हीचा संशयास्पद मृत्यू झाला. मळ्यातील घरासमोर असलेल्या विहीरीतील पाण्यात तिचा मृतदेह आढळला. शुक्रवारी सकाळी हा प्रकार उघडीस आला. याबाबत गुन्हा जत पोलिसात दाखल झाला आहे.

रूपाली हीने विहीरीत उडी मारून आत्महत्या केल्याचे सासरच्या लोकांचे म्हणने आहे. तर हा घातपाताचा प्रकार असल्याची तक्रार वडील गंगाराम गडदे, रा. बाज यांनी जत पोलिसांत दिली. 

Rate Card

याप्रकरणी गांवकामगार पोलिसपाटील बजरंग बापू पाटील यांनी जत पोलीसात फिर्याद दाखल केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की,रुपाली व बाजीराव यांचा सात वर्षापूर्वी विवाह झाला असून त्यांना दोन मुले आहेत. रुपाली सवदे एकत्र कुटुंब पध्दतीने पती बाजीराव,सासू छाया, सासरा संभाजी , दिर गजानन व लहान मुलासह एकत्रित आठजण रहात होते.मिरवाड ते खलाटी रस्त्यावर मिरवाड पासून आर्धा किलो मिटर आंतरावरील मळ्यात रहातात. रुपाली हीचे माहेर बाज (ता.जत) आहे.  सकाळी किरकोळ घरगुती कारणावरुण पती- पत्नी मध्ये जोरदार वादावादी झाली होती. दरम्यान सकाळी अकरा वाजता तिचा मृतदेह आढळला. रूपालीचे वडील गडदे यांनी जत पोलिसांत तक्रार दिली आहे.  आपल्या मुलीचा पती,  सासू सासरा, दीरानी खून केल्याचे तक्रारीत म्हंटले आहे. जत ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले आहे.  विसेरा राखून ठेवला आहे. पुढील तपास पोलिस उप निरीक्षक तम्मा चोरमुले करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.