नगरपालिका निवडणूक ; पॅनेल प्रमुख आ. विलासराव जगताप,विक्रम सांवत, सुरेश शिंदे मैदानात
निर्णायक प्रचाराला वेग
जत,प्रतिनिधी : जत नगरपालिकेच्या निवडणूकीच्या प्रचाराची रंगत वाढली आहे. नगरपालिका स्थापनेनंतरची हि दुसरी पंचवार्षिक निवडणूक होत आहे. कॉग्रेस,भाजप व राष्ट्रवादी कॉग्रेस अशी थेट तिंरगी लढत होत आहे. जत तालुक्यातील तीन ताकतवान नेते आ.विलासराव जगताप,कॉग्रेस नेते,जिल्हा बँक संचालक विक्रम सांवत,राष्ट्रवादीचे नेते माजी सभापती सुरेश शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. उमेदवारांची प्रचार यंत्रणा आता तिन्ही नेत्यांनी हातात घेतली आहे. निर्णायक प्रचार मोहिमेत तिघेही मैदानात उतरले आहेत. थेट प्रचार व मतदार भेटीवर जोर दिला जात आहे. अखेरच्या टप्प्यात स्टार नेत्यांच्या प्रचार सभाचा धुरळा उडणार आहे. तत्पुर्वी प्रचाराच्या तालुक्याच्या नेत्याच्या तोफा धडधडत आहेत. कोपरा सभा,पदयात्रा,जनसंपर्कांने वातावरण टाईट बनले आहे. शहरातील आपली प्रधुत्व कायम राहावे यासाठी गत निवडणूकीत पहिल्या दमात सात नगरसेवक निवडून आणलेले विक्रम सांवत यांनी जंगजंग पछाडले आहे. कोणत्याही स्थितीत थेट नगराध्यक्ष सह बहुमताने सत्ता आणण्यासाठी ते मैदानात उतरले आहेत.कॉग्रेसला तालुकाभरातील ग्रामपंचायत निवडणूकीतील मोठे यश,भाजप व सतत सत्तेमुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांविरोधातील नाराजी व स्वत:ची स्वच्छ प्रतिमा हे सांवत यांची जमेची बाजू आहेत. दुसरीकडे गेली तीन दशके शहरचे सत्ताकेंद्र ताब्यात असलेले सुरेश शिंदे यांना गत निवडणूकीतील अनुभव लक्षात घेऊन त्यांनी प्रचार यंत्रणा राबविण्यास सुरूवात केली आहे. सर्व उमेदवारांचे नवे चेहरे त्याची जमेची बाजू आहे.तिसरे भाजपचे नेते आमदार विलासराव जगताप यांना आतापर्यत जत शहरात सत्ता मिळविता आली नसल्याचे त्यांना अनेक वर्षे जत तालुक्यातील राजकारण करताना सल्य आहे. त्यामुळे यंदा सत्ताधारी भाजपच्या विकासाचे धोरण, शहरातील स्वच्छ प्रतिमेचे भाजप नेते डॉ. रविंद्र आरळी यांच्या पत्नी डॉ. रेणुका आरळी यांच्या थेट नगराध्यक्ष उमेदवारीनी भाजपला चांगले वातावरण निर्माण करण्यात ते यशस्वी झाले आहेत. थेट नगराध्यक्ष पदाचा चारिञ्यवान व उच्चशिक्षित उमेदवार, भाजपची दिल्ली ते गल्ली पर्यतची

सत्ता ही त्याची जमेची बाजू आहे.
प्रत्यक्षात आजपासून निर्णायक प्रचार सुरू झाला आहे. सर्व शक्यता गृहीत धरून नेते,उमेदवार कामाला लागले आहेत. तिंरगी तुल्यबंळ लढतीमुळे नेमका विजय कोणाचा हे निश्चित सांगणे कठीण बनले आहे. मात्र उमेदवारांच्या वाढलेल्या संख्येने मतदारात फिलगुड आहे.
