जत,प्रतिनिधी : गत निवडणूकीत आश्वासने देऊन निवडून आलेल्या कॉग्रेस व शहरातील नगरसेवकांनी जत मधील नागरिकांच्या विश्वासघात केला.विकासाच्या नावावर नगरपालिकेच्या निधीची लुटमार केली आहे. म्हणून अशा लोकांची आम्ही हकालपट्टी केली आहे. जिकडे हे लोक गेले आहेत. तेथीलही आवस्था वाईट करून ठेवली आहे.अशा प्रवृत्तीविरोधात आम्ही लढत आहे.सशस्त जतचे विकासाचे व्हिजन आमच्या कडे आहे असे प्रतिपादन माजी सभापती सुरेश शिंदे यांनी केले.
प्रभाग- 8 च्या राष्ट्रवादी कॉग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ विद्यानगर येथील कोपरा सभेत शिंदे बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शबाना राजू इनामदार, उमेदवार मुबारक नदाफ, भारती प्रविण जाधव,डॉ. पराग पवार,बंदेनवाज पटाईत,ए.डी.माने,उत्तम चव्हाण, बाजी केंगार आदी उपस्थित होते.
शिंदे म्हणाले, जत शहरातील स्थिती दयनीय आहे. शहराला विकालाच्या नावावर भकास केले आहे. त्याला मागील पंचवार्षिक निवडणूकीत निवडून आलेले नगरसेवकच जबाबदार आहेत. रस्ते,गटारीची कामे, पाणी पुरवठा, स्वच्छता, दिवाबत्ती, या मुलभूत गरजांही सत्ताधारी मंडळीनी पुर्ण केल्या नाहीत. शहरातील प्रंचड अडचणीचा प्रश्न वाहतूकीचा बनला आहे.रस्त्यावरील खड्ड्याने नागरिकांना मरणयातना सहन करण्याची वेळ आली आहे. कमी दाबाने अशुध्द पाणी पुरवठा, तुंडूब गटारी,सांडपाणी साठून वाढलेल्या डासांमुळे डेग्यू,मलेरिया,चिकनगुणीयाचे रुग्ण वाढत आहेत.
मागील निवडणूकीत कोणासही स्पष्ट बहुमत मिळाले नाही. या त्रिशंकू अवस्थेचा फायदा घेऊन नगरसेवकांनी लुटमारी करून शहराला लुटण्याचा उद्योग केला. कॉग्रेसकडून अशा उमेदवारी दिली आहे. त्यांना जागा दाखविण्याची वेळ आता आली आहे.
शिंदे म्हणाले, शहरात राष्ट्रवादीला अतिशय पोषक वातावरण आहे. शहराच्या विकासासाठी व्हिजन घेऊन आम्ही निवडणूकीत उतरलो आहोत. स्वच्छ प्रतिमेचे सर्वसामान्यातून आलेले उमेदवार दिले आहेत. त्यामुळे यंदा नगराध्यक्षासह पालिकेवर बहुमताने राष्ट्रवादीचा झेंडा फडकेल असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.





