जत येथे बुधवारी जगद् गुरू नरेंद्राचार्य महाराज यांचा प्रवचन व दर्शन सोहळा

0


जत,प्रतिनिधी : अंनत श्री.विभुषित जगद् गुरू  स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज दक्षिणपीठ नाणीजधाम यांचा प्रवचन व दर्शन सोहळा बुधवार ता.6 डिंसेबरला जत येथील जत हायस्कूल जतच्या भव्य मैदानावर संपन्न होणार आहे.

जत तालुक्यातील भाविकासाठी ह्या सोहळ्याचे आयोजन केले आहे. शहरातील जत हायस्कूल मध्ये भव्य मंडप उभारण्यात आला आहे. जतसह लगतचे तालुके व कर्नाटकातील भाविक मोठ्या प्रमाणात उपस्थित राहणार असल्याने तशी व्यवस्था करण्यात आली आहे. संतपीठाची मांडणी करून प्रवचनाचा लाभ घेण़्यासाठी एलइडी वॉलची व्यवस्था करण्यात आली आहे. वाहनाचे पार्किंग व भाविकाच्या सोयीसाठीच्या उपाययोजना पुर्ण करण्यात आल्या आहेत.कार्यक्रम स्थळी जगद् गुरूश्रीच्या पादुकांचे आगमन होणार आहे. गुरूपुजन,श्री लिलामृत्त ग्रंथाचे पारायण,आरती सोहळा होईल.अमृतमय प्रवचनात दिव्य ज्ञानाची अनुभूती होईल.प्रवचनानंतर गुरू-शिष्य साधक दिक्षा दिल्यानंतर पादुकाचे दर्शन घेता येणार आहे. शेवटी पुष्पवृष्टी करून सांगता होईल.सोहळ्यात महाप्रसादाचे आयोजन केले आहे. प्रथमच प्रत्येकाला स्वतंत्र गुरूपुजन व पारायण करायला मिळणार आहे. या सोहळ्यास जास्तीत जास्त भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन सांगली जिल्हा सेवा समितीचे सेवाध्यक्ष सुरेश शिंदे यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.