सत्ताधारी गटाच्या लाथाळ्या व चिखलफेकमुळे त्यांचाच गैरकारभार, भष्ट्राचार चव्हाट्यावर पाच वर्षात स्वार्थी,भष्ट्र कारभाराने जतला मलिन करणाऱ्यांना हाकला ; अॅड. श्रीपाद अष्टेकर

0

जत,प्रतिनिधी : जत नगरपालिकेच्या निवडणूकीच्या प्रचारात कॉग्रेस व राष्ट्रवादी कॉग्रेस यांच्यातील लाथाळ्या व चिखलफेकमुळे त्यांचाच गैरकारभार व भष्ट्राचार उघड्यावर येऊ लागला आहे. याचा फायदा निश्चितच यावेळी भारतीय जनता पार्टीस होणार आहे. अशी माहिती भाजप नेते अॅड. श्रीपाद अष्टेकर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली.

अष्टेकर यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात पुढे म्हटले आहे की,गेल्या 20-25 वर्षे एकहाती सत्ता असतानाही जतला भकास केले. अनेक वर्षे सत्ता भोगून केलेला कारभार आता चव्हाट्यावर येवू लागला आहे. चोऱ्यांच्या टोळीचे वाटणी वरून भांडण झाले की,चोरी उघडकीस येते तसाच प्रकार नगर पालिकेत घडताना दिसत आहे.कुटूंब प्रमुख बिघडला की कुंटुबाचे नुकसान होते तसा काहीसा प्रकार जतेत सुरू आहेत. गत पाच वर्षातील सत्ताधीशानी कहर केला आहे. जत पालिकेतील गलिच्च कारभाराने प्रतिमा डागाळली आहे.

Rate Card

दीर्घकाळ सत्तेत असताना नगरसेवक व त्यांच्या नेत्यांनी बिगरशेतीचे प्लॉटची,गुठेंवारी प्लॉटची नोंद करतेवेळी किती प्लॉट मिळविले. व किती रक्कमेचा भष्ट्राचार झाला हे आता उघडकीस येवू लागले आहे.यल्लम्मा यात्रेसाठी खुली असलेली जमिन खुलेआम विकली जात आहे. त्यांच्या नोंदी ग्रामपंचायत व नगरपालिकेत झाल्या आहेत.

नगरपालिका होण्यास विरोध होता.नगरपालिका झाल्यावर किती नगरसेवकांचे उथळ पांढरे झाले हे जनतेला ज्ञात आहे.शहराच्या विकासासाठी नगरसेवकांच्या बैठका होण्याऐवजी विकासाच्या आलेला निधी व त्यामधील टेंडर कोणांच्या नावे द्यायचे या विषयी जास्त बैठका झाल्या.शहरामध्ये वाहतूक समस्या,भाजी मंडई,बोगस नळ कनेक्शन,पाणी पुरवठ्यातील अनियमितता,तुंबलेल्या गटारी व अस्वच्छता सुधारण्यासाठी नगरसेवक प्रयत्न करताना दिसले नाहीत. मात्र नगरसेवक म्हणून मिरविण्यात त्यांचा जास्त वेळ गेला.नगरपालिकेच्या हद्दीतील खुल्या जागा, ओढापात्र हवे तसे बेघरांच्या नावाखाली वाटण्यात आले आहेत. निधीतील अनेक वाद मंत्रालयापर्यत पोहचले आहेत. सततची सत्ता सोडवित नसल्याने पुन्हा बोगस विकासाच्या नारा देत वेगवेगळ्या झेंड्याखाली निवडणूका लढविल्या जात आहेत. निवडणूका लढविणाऱ्यां नगरसेवकांच्या उदरनिर्वाहाचे नगरपालिका साधन बनली आहेत.त्यामुळे पक्षाचे नेते व नगरसेवकांच्या उत्पन्नाचे साधन व मालमत्ताची चौकशी करणे गरजेचे आहे. हे चित्र बदलण्यासाठी विकासाच्या मुद्यावर भारतीय जनता पार्टी निवडणूक लढवित आहे.शहरात भाजप सरकारच्या नियोजनातून मिळालेल्या विकास निधीचा सदूउपयोग करण्याऐवजी सत्तेतील भ्रष्ट नगरसेवकांनी विकास निधीवर डल्ला मारून निकृष्ठ दर्जाचे रस्ते ,गटारी केला आहे. अशा भ्रष्ट नगरसेवकांना यावेळी घरी बसवून विकासाचे व्हिजन असलेल्या भाजपला विजयी करावे,यावेळी भाजपकडून स्वच्छ प्रतिमेच्या,सुशिक्षित व राजकीय वारसा लाभलेल्या उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी उभ्या आहेत.जतच्या सर्वागिंन विकास साधायचा असेलतर डॉ. रेणुका आरळी यांना विजयी करणे महत्वपुर्ण बनले आहे. कोणत्याहा मतलबी राजकारणासाठी त्या निवडणूक लढवित नाहीत तर जतला नवी दिशा व नवनिर्माण करण्यासाठी विकासाचं मजबूत व्हिजन घेऊन त्या मैदानात उतरल्या आहेत. भाजपचे इतरही नगरसेवक पदाचे उमेदवार चांगल्या जतसाठी प्रयत्न करतील. त्यामुळे दिल्ली ते गल्लीपर्यत भाजपची सत्ता आणण्यासाठी भाजपच्या उमेदवारांना संधी द्या असे आवाहन शेवटी अॅड.अष्टेकर यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे. 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.