फुटके रस्ते,खड्ड्याने वैतागलेला मतदारांचा दणका कुणाला नगरपालिकेच्या अख्यारितील रस्ते फुटले :पाच वर्षात नागरिक बेहाल;पुन्हा विकासाचा नारा

0

जत,(प्रतिनिधी)शहरातील मुख्य रस्ता तसेच अंतर्गत रस्त्यांवर ठिंकठिकाणी खड्डे पडल्याने ये-जा करताना नागरिकांचे प्रचंड हाल होत आहे. मागील वर्षभरापासून नागरिकांना जणू अडथळ्यांची शर्यतच पार करावी लागत असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. दुचाकीस्वार व पादचार्‍यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. मात्र गत पाच वर्षात नगरपालिका पदाधिकारी दृष्टिहीन झाल्याने या रस्त्यांसाठी आतापर्यंत खर्च केलेला पैसा पाण्यात गेल्याची चर्चा आहे.

शहरातील कॉलनी परिसर,गावाभातील अंतर्गत रस्ते किरकोळ पाऊसात चिखलमय होतात. या रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. शाळेच्या वेळेत या रस्त्यांवर प्रचंड गर्दी होत असल्याने विद्यार्थ्यांची या रस्त्यावरून मार्गक्रमण करताना जनतेची तारांबळ उडत आहे. या रस्त्यावरील खड्डय़ाची डागडुजी करणे गरजेचे होते. परंतु नियोजनशून्यतेमुळे नागरिकांना मरणयातना सहन कराव्या लागत आहे. या रस्त्यांवरील खड्डय़ात मुरूम टाकला गेला असता किंवा ज्या ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत त्या ठिकाणी तात्पुरती डागडूजी केली असती तर नागरिकांचा त्रास टळला असता. खड्डय़ांमुळे अनेकांना कंबरेचे आजार जडले आहेत. 

Rate Card

दुचाकीस्वारांना खड्डय़ांमुळे किरकोळ दुखापती झाल्या आहेत.काही नालीवर टाकलेले रपटे फुटल्याने अपघाताची शक्यता बळावली आहे. प्रत्येक प्रभागात रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. रस्त्यावरून मार्गक्रमण करताना जीव धोक्यात घालून नागरिकांना वाहन चालवावे लागत आहे. कॉलनी परिसरातील रस्त्यांची दैनावस्था झाली आहे. यामुळे या शहराची खड्डय़ांचे शहर म्हणून नवीन ओळख निर्माण झाल्यास आश्‍चर्य वाटू नये? जत मधील रस्त्यांवरून वाहने चालविणे म्हणजे यज्ञचं बनले आहे. अनेकांना या रस्त्यावरील खड्डय़ांमुळे कंबरेचे आजार जडले आहेत. परंतु नव्या निवडणूकीत नव्याने मतदारांचे उंबरे झिंझवणारे उमेदवार मात्र ‘ऑल इज वेल’ भासवत आहेत.  रस्त्याच्या खड्ड्यात मतदार दणका कोणत्या उमेदवारांन देणार असा उद्गिन्न सवाल उपस्थित होत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.