नाटक : पती गेले ग काठेवाडी,, देखणी नाटयकृती,,

0

नाटक पती गेले ग काठेवाडी,, देखणी नाटयकृती,,

सुबक हर्बेरियम ह्या लोकप्रिय नाटयसंस्थेने ह्यापूर्वी लोकप्रिय असलेली जुनी गाजलेली नाटके रसिकांच्या साठी फक्त काही मोजके प्रयोग करून सादर केलीआजच्या या नवीन पिढीला जुन्या गाजलेल्या लेखकांच्या लोकप्रिय नाटकांची ओळख व्हावी आणि त्याचा आनंद घेता यावा ह्या हेतूने हर्बेरियम २ तर्फे ” पती गेले ग काठेवाडी ” हे नाटक सादर करण्यात आलेनिर्माते सुनील बर्वे हे आहेत.

पतिव्रता ह्या शब्दाचा अर्थ मोठा आहेएकनिष्ठेने आपले सर्वस्व आपल्या पतीच्या चरणी स्त्री अर्पण करतेकाही हि झालं तरी आपले शील भ्रष्ट होऊ देत नाहीते एक व्रत असत आणि हे व्रत पार करताना तिला अनेक अडचणींना संकटाना सामोरे जावे लागतेस्त्रीया ह्या मुळातच हुशार आणि चतुर असतातहि मध्यवर्ती कल्पना पती गेले ग काठेवाडी ह्या नाटकात सुप्रसिद्ध कथाकार आणि नाटककार व्यंकटेश माडगूळकर यांनी मांडली आहेह्या नाटकाचे वैशिष्ठ म्हणजे ह्यामध्ये लोकनाटय आणि पारंपरिक नाटक ह्याचा सुंदर मिलाप त्यांनी घडवून आणलेला आपल्याला पाहिला मिळतोह्या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबई मराठी साहित्य संघ यांनी १९६८ मध्ये सादर केला होतात्यावेळी त्याचे दिगदर्शन आणि संगीत सुधा करमरकर यांनी केलं होत.त्यानंतर आता ह्या नाटकाला दिगदर्शन विजय केंकरे यांचे लाभले असून आता नवीन कलाकारांच्या संचात हे नाटक सादर केलं आहेयामध्ये निखिल रत्नपारखीललित प्रभाकरअभिजित खांडकेकरमृणमयी गोडबोलेईशा केसकरहे कलाकार असून सोबतीला धनंजय म्हसकरसिद्धेश जाधवधम्मरक्षित रणदिवेसंतोष साळुंकेश्रीकांत वावदेहे आहेतया नाटकाची संगीताची महत्वाची बाजू राहुल रानडे यांनी सांभाळलेली आहेवादक कलाकार अमित पाध्येवेदांग लेलेसंदेश कदममयूर जाधवहे असून आकर्षक देखणे नेपथ्य प्रदीप मुळ्ये यांचे आहेप्रसंगाला साजेशी प्रकाश योजना शीतल तळपदे यांची तर प्रसंगानुरूप वेशभूषा मंगल केंकरे यांनी सांभाळलेली आहेनाटकाची निर्मिती सुनील बर्वे यांची असून सूत्रधार श्रीपाद पद्माकर आणि व्यवस्थापन प्रकाश सावंतनितीन नाईक यांचे आहे.

नाटकाच्या सुरवातीला पारंपरिक पद्धतीचा सूत्रधार सामोरा येतो आणि पाठोपाठ शाहीर येतो आणि दोघे मिळून नाटकाचे कथानक पुढे नेतातहि कथा एका सुभेदाराचीआणि त्याच्यावर प्रेम करणाऱ्या त्याच्या पत्नीची म्हणजेच सर्जेराव शिंदे आणि त्याची पत्नी जानकीची आहेपेशवाईच्या कालखंडातील हा सुभेदार वसुली साठी काठेवाडला जातो त्यावेळी त्याच्या घरी पत्नी जानकी तिच्या सखी बरोबर अर्थात मोहना बरोबर राहणार असतेसर्जेराव चौथाईच्या वसुलीसाठी मोहिमेवर निघतो त्यावेळी तो आपल्या पत्नीला काही अटी घालतोत्या अटींमध्ये तिने एकही पैसा खर्च न करता आरसे महाल बांधावा,आपल्यासाठी सवत आणावेआणि पुत्ररत्नाला जन्म द्यावा,अश्या ह्या विचित्र अटी तिने मी मोहिमेवरून येण्यापूर्वी पूर्ण कराव्यात असे सांगून जातोत्यावेळी जानकी आपल्यादारी असलेल्या बकुळीच्या फुलांचा ” गजरा तुरा ” त्यांच्या पगडीला बांधते आणि ” तुरा ” जो पर्यंत ताजा आहे तो पर्यंत मी सुखरूप आहे असे समजावे असे ती सांगतेजानकी हि एकनिष्ठ पतिव्रता असते तशीच ती चतुर हि असतेआपल्या पतिराजांच्या सर्व अटी ती मान्य करतेसुभेदार काठेवाड ला पोहोचतो त्यावेळी तेथील राजा जोरावरसिंह ला जेंव्हा कळते कि सुभेदाराची पत्नी जानकी एकटी आहे त्यावेळी तिचे पावित्र्य नष्ट करावे ह्यासाठी तो आपला दिवाणजी ह्याला सुभेदाराच्या घरी पाठवतोसुभेदारांनी दिलेल्या अटींचे पालन करून जानकी त्या सर्व अटी कश्या पूर्ण करते हे जाणून घेण्यासाठी नाटक पाहायलाच हवंहे सारे नाटयमय रीतीने नाटककार व्यंकटेश माडगूळकर यांनी गुंफलं आहेलोकनाटय पारंपरिक नाटय ह्याचे उत्तम मिश्रण ह्या नाटकात आहे.

दिगदर्शक विजय केंकरे यांनी हे नाटक अत्यंत बंदिस्तपणे सादर केलं आहेराहुल रानडे यांनी दिलेलं नाटकाचे संगीत हे नाटकाला उठाव आणणारे असून त्यामध्ये त्यांनी गुजरात मधील पारंपरिक संगीताचा वापर छान केला आहेधनंजय म्हसकर सूत्रधार सिद्धेश जाधव शाहीर यांनी आपली कामगिरी उत्तम सांभाळलेली आहेया बरोबर वादक कलाकारांना विसरून चालणार नाहीनेपथ्यामधील बदल हा सुद्धा कुठेही प्रसंगाला बाधा न आणता केला आहेअभिजित खांडकेकर यांनी सर्जेराव ची भूमिका मनलावून केली असून दिवाणजींच्या भूमिकेत ललित प्रभाकर यांनी आपल्या भूमिकेला योग्यतो न्याय दिलेला आहे,मृणमयी गोडबोले हिने जानकीची भूमिका आणि ईशा केसकर हि मोहनची भूमिका छान सादर केली आहेत्याच प्रमाणे निखिल रत्नपारखी यांनी जोरावरसिंह ची भूमिका उत्तम रंगवली आहे.

एकंदरीत हे नाटक प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतेनाटकाचा आस्वाद घ्यायला हरकत नाही.

Rate Card

दीनानाथ घारपुरे मनोरंजन प्रतिनिधी ९९३०११२९९७

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.