जतच्या विकासासाठी कॉग्रेसला साथ द्या ; आ. मोहनराव कदम
कॉग्रेसला प्रचाराचा नारळ फुटला
जत,प्रतिनिधी : मोठी आश्वासने देऊन सत्तेत आलेले पंतप्रधान व मुख्यमंञ्यांनी जनतेचा अपेक्षाभंग केला आहे. कर्जमाफी,जिएसटी, आधारकार्ड,नोटाबंदीत जनतेला वेठीस धरण्याने देश व राज्यातील भाजपचे वातवरण निवळून कॉग्रेस पक्षासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे जत नगरपालिकेच्या निवडणूकीही कॉग्रेसचे पँनेल बहुमताने विजयी होईल असा विश्वास आ. मोहनराव कदम यांनी व्यक्त केला. ते नगरपालिका निवडणूकीतील कॉग्रेसच्या प्रचार सभेत बोलत होते.यावेळी सांगली शहर अध्यक्ष गुलाबराव पाटील,विक्रम सांवत,डॉ. नामदेव कत्तुरे,हारूण शिकलगार,माजी आमदार उमाजीराव सनमडीकर आदि मान्यवर उपस्थित होते.
आ. कदम पुढे म्हणाले, नुकत्याच जत तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूकीत तालुक्यातील मतदारांनी भरघोस मतदान करून कॉग्रेसला नंबर वन बनविले आहे. त्याच पध्दतीने जतच्या सर्वागिंन विकासाठी शहरातील मतदारांनी कॉग्रेसच्या उमेदवारांना मतदान करावे,कॉग्रेसच जतचा कायापालट करू शकते असे शेवटी कदम म्हणाले
कॉग्रेस नेते विक्रम सांवत म्हणाले,गत निवडणूकीत पक्ष हिताला प्राधान्य देत एक पाऊल मागे घेत सुरेश शिंदे बरोबर तडजोड करण्याचा प्रयत्न केला.पंरतू त्यांनी आम्हाला बेदखल केले. मी कुंटूबप्रमुख आहे, जत शहरात मतदान नसलेले नेते जतचा काय विकास करू शकतील असे सांगतात.पंरतू जत सारख्या मोठ्या कुंटूबाला त्यांनी भकास केले. सतत सत्तेमुळे त्यांनी शहरातील जनतेला गृहीत धरून मनमानी कारभार केला. प्रत्येक निवडणूकीत भूमिका बदलत जनतेला टोलवत ठेवले आहे. जतचा विकास कांमात सतत अडथळा आणला असा आरोप सांवत यांनी केला. कॉग्रेसचे पक्ष निरिक्षक प्रकाश सातपुते म्हणाले,भाजपने गोड बोलून मते घेतली,सर्व आपल्या मनाप्रमाणे कारभार करत जनतेला वेठीस धरले आहे.सामान्य जनतेला भाजप सरकारच्या निर्णयाचा आजही त्रास सहन करावा लागत आहे. जिएसटी,नोटाबंदी सारख्या योजना आणून उद्योग, व्यवसाय संपविले,शेतकऱ्यांन वेदना दिल्या, त्यामुळे भाजप सरकार विषयी जनतेत असंतोष उसळला आहे. त्यामुळे यावेळी चुक सुधारण्याची संधी जनतेला आली आहे. त्यातिल जत नगरपालिकेच्या निवडणूकीत कॉग्रेसला संधी देऊन मजबूत जत करा.
नाना शिंदे म्हणाले,नुसते आरोप करून राजकारण करणाऱ्यांनी आत्मपरिक्षण करावे, आम्हीही स्वकृत्तावर जत शहरात राजकारण करतो आहोत. स्व:हितासाठी मतलबी राजकारण केले नाही. जतच्या जनतेचे आर्शिवाद आहे. म्हणून तिन दशकाहून जास्त काळ आम्ही राजकारणात आहोत. त्यामुळे दलबदलू राजकारण करून तिस वर्षात शहराची कशी वाट लावली हे वेगळं सांगायची गरज नाही.
इकबाल गंवडी म्हणाले,माझ्यावर भष्ट्राचाराचे आरोप करताना शिंदे यांनी माझी किमान आर्थिक स्थिती तपासावी,गेल्या तिस वर्षापासून मी आहे.त्या पञ्याच्या घरात राहतोय,भावाने दिलेले दुचाकी नापरतोय,वडिलार्जित दहा एकर जमिनी पैंकी पाच एकर जमिन मी विकली आहे. भष्ट्राचार करून पैसै मिळविले अलतेतर टोंलेजग बंगला बांधला असता,किंमती चारचाकी घेतली असते.जमिन विकली नसती. त्यामुळे आरोप करताना स्व:ताच्या वाढलेल्या आर्थिक आलेखाचा विचार करावा, जनता वेडी नाही,या निवडणूकीत सर्वाचेच हिशोब होतिल.
इराण्णा निडोणी यांनी स्वागत केले. डॉ. नामदेव कत्तुरे, नगरसेवक मोहन कुलकर्णी, शुंभागी बन्नेनावर, हारूण शिकलगार,पृथ्वीराज पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी नगरसेवक मुन्ना पखाली, महादेव कोळी,रविंद्र साळे,श्रींकात शिंदे, माया साळे,मनिषा साळे,निलेश बामणे,बंटी नदाफ, बाबासाहेब कोडक,युवराज निकम,गणेश गिड्डे,प्रविण पाथरूट, उपस्थित होते. आप्पाराय बिराजदार यांनी आभार मानले.
जत नगरपालिकेच्या प्रचारार्थ आयोजित कॉग्रेसच्या प्रचार आ. मोहनराव कदम,गुलाबराव पाटील, विक्रम सांवत, माजी आमदार उमाजीराव सनमडीकर व मान्यवर





