डॉक्टर ताई काळजी करू नका,विजय तुमचाचं आहे. प्रचार दरम्यान भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉ. रेणुका आरळी यांना मतदारांची मनपुर्वक साद

0

जत,प्रतिनिधी : जत नगरपालिकेच्या निवडणूकीच्या रणधुमाळी निर्णायक टप्प्यावर आली आहे. सर्वच उमेदवारीनी प्रचाराचा धुरळा उडविला आहे. या सर्वात एक चेहरा शहरभर भावतोयं. जतचे वैद्यकीय क्षेत्रातील अभ्यासू,सुपरिचित व वैद्यकीय क्षेत्रातील “देवमाणूस” सक्रीय राजकारणात उतरले आहेत. त्यांच्या पत्नी डॉ. रेणुका आरळी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत. कायम हातात स्टेटस्कोप असणारे डॉ.जनता जनातार्दनाच्या दरबारात नशिब आजमावत आहेत. एकेकाळी वैद्यकीय सुविद्यासाठी मिरज सांगलीला जावे लागत होते. त्यात रविंद्र आरळी यांनी वैद्यकीय क्षेत्रात किमया साधत हॉस्पिटल क्षेत्रात जतचा नावलौकिक निर्माण केला आहे. कायम भाजपशी एकनिष्ठ असलेले डॉ. आरळी यांना पक्षाने थेट नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारी त्यांच्या घरात देत आता लोकहिताच्या कामासाठी बाहेर पडा असा विश्वास दिला आहे. त्याला जागत डॉ. आरळी दांपत्य नव्या इनिंगची सुरूवात करत आहेत. भष्ट्र कारभाराने माकलेल्या नगरपालिकेत नाविन्य आणण्यासाठी डॉ. दांपत्य योगदान देणार आहेत. मोठ्या व्याप,व आर्थिक मजबूती असतानाही ते सक्रीय राजकारणात उतरले आहेत. फक्त जतला बदलायचे आहे. त्यासाठी आम्हाला मतदान करा असा डॉ. आरळी यांच्या ह्रदयातील आवाज जनतेला भावत असून डॉक्टर ताई तुम्ही काळजी करू नका विजय तुमचाचं आहे. अशा प्रतिक्रीया प्रचारा दरम्यान मतदार व्यक्त करत आहेत. विकास,जतला नवी दिशा देण्यासाठी जतचा आपला माणूस कोणत्याही अपेक्षेशिवाय राजकारणात उतरला आहे. जतचं भकासपण बदलायचे आहे. विकास साधायचा आहे. राज्यातील आदर्श शहर बनविण्यासाठी आमच्या पँनेलच्या सर्व उमेदवारांना विजयी करा,जतचं राजकारण बदलू असा विश्वास डॉ. रविंद्र आरळी हे मतदारांना देत आहे. त्यांना मिळणारा उंदड प्रतिसाद अनेकांना धडकी भरवत आहे.

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.