यंत्रणा नगरपालिकेची कारभार ग्रामपंचायतीचाच निवडणूक समोर ठेवून आरोपाच्या फैरी सुरू ; विकासाचाही मुद्दा गाजतोय

0

जत,प्रतिनिधी : जत नगरपालिकेच्या निवडणूकीचे धुमशान सुरू झाले आहे. लाख सघर्षानंतर झालेल्या ग्रामपंचायतीच्या पालिकेची हि दुसरी पंचवार्षिक निवडणूक होत आहे. गत पाच वर्षात खरचं ग्रामपंचायत आहे का? नगरपालिका हे अवगत करण्यासाठी गेलेत. विकास ग्रामपंचायती सारखा झाला. चर्चा झाली भष्ट्राचारावर सत्तेच्या खुडच्या उबवून बाहेर पडल्यानंतर, काही नगरसेवकांना पालिकेत सत्ताधाऱ्यांनी भष्ट्राचार केल्याचा साक्षात्कार झाला. त्यामुळे मोठे रणखंदन झाले. मात्र जे पाच वर्षात जागे झाले नाहीत ते निवडणूका समोर येताच जागे झाले हे विशेष.. पहिले चार वर्ष ग्रामपंचायतीचा कारभारचं झाला. कर्मचारीच नगरपालिका चालवितात असे आरोप झाले. शेवटच्या सव्वा वर्षात आलेल्या कृतत्व दक्ष मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी पालिका प्रशासनात मोठा कायापालट करत विकासाचे धोरण अवलबंले कामेही मोठ्या प्रमाणात झाली. मात्र काही नगरसेवकांना आपल्या मनाप्रमाणे कारभार करता येईना,त्यामुळे चांगल्या अधिकाऱ्यां विरोधात उठाव सुरू झाला.त्यातून झालेली काहीना कामे दर्जाहीन वाटू लागली.प्रत्येक बैठकीत विरोध होऊ लागला. मात्र यात खरचं विरोधात मतदारा विषयी प्रेम होत का? हा संशोधनाचा विषय आहे. प्रत्यक्षात सगऴ्याचा हिशोब जनता जनार्दनाकडे असतोच तो या निवडणूकीत दिसेल.

Rate Card

पालिका स्थापन होऊन पाच वर्षे लोटली आहेत. जत शहर खरचं पालिका आहे का? यावर संशोधन करावे लागेल. नागरिकांना अपेक्षित असलेल्या रस्ते,पाणी,दिवाबत्ती, आरोग्य सारख्या सुविद्याही व्यवस्थित मिळत नसल्याची ओरड आहे. शहरात अनेक भागात डांस,दुर्गंधीमुळे अनेक भागात वावरतांना तोंडाला रुमाल लावण्याची वेळ येते. स्टँड परिसर,गंधर्व नदीसह शहरातून वाहत असलेले नाल्याची परिस्थिती बघितल्यावर शहराचे बकालपण सिध्द करते. गत पाच वर्षात खरचं विकास झाला का?यावरही विचार करावा लागणार आहे. मात्र गत पाच वर्षात करोडाचा निधी खर्ची पडला आहे. प्रत्यक्षात निम्याहून जादा कामे ऱखडली आहेत. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काही कामे झाली,त्यातही भष्ट्राचाराचे आरोप झालेतं. कोण काय करतयं हे गत पाच वर्षात कळतं नव्हतं, त्यामुळे सत्तेतील यंदाच समिकरणे प्रस्तापित राजकारण्याना धक्का देणार ठरलं एंवढ निश्चित.!

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.