शुध्दीकरण यंत्रणा नसल्याने डफळापूरला अशुध्द पाणी पुरवठा

0

Rate Card

डफळापूर, वार्ताहर : डफळापूर ग्रामपंचायतीच्या पाणी योजनांना पाणी शुध्दीकरण यंत्रणा नसल्याने ग्रामस्थांना अशुध्द पाणी पुरवठा होत आहेत. परिणामी नागरिकांना आजही गावा लगतची तलावे भरलेले असताना एक रुपयाला एक लिटर शुध्द पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. डफळापूर ग्रामपंचायतीच्या विस्तार वाढला,आर्थिक उत्पन वाढले,मोठा निधी आला. खर्चही झाला मात्र गेल्या पंचवीस वर्षापासून डफळापूर करांना शुध्द पाणी पुरवठा करणारी यंत्रणा बसवावी असे आजपर्यतच्या सत्ताधाऱ्यांना वाटले नाही.तीस वर्षापुर्वीच्या कालबाह्य पाणी पुरवठा यंत्रणेतून गावाला पाणी पुरवठा होत आहे. पाणी साठवण टाकीही कालबाह्य झाली आहे. ती कधी कोसळेलं यांचा नेम नाही. टाकी बांधल्यापासून एकदाही टाकीची स्वच्छता केलेली नाही. सध्या गावाला होणारा पाणी पुरवठा तलावालगतच्या विहिरीतून होत आहे. त्यामुळे विहिरीतही अशुध्द पाणी आहे. क्षार वाढलेले आहेत.मात्र श्रींमत वगळता सामान्य जनता हेच पाणी पित आहे. त्यामुळे अशुध्द पाण्यामुळे अनेकांना आजार बळांवले आहेत. आता नविन सत्ताधारी चांगल्या विचाराचे आहेत. त्यांनी डफळापूरला शुध्द पाणी पुरवठा करण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.