जतच्या विकासासाठी भाजपला संधी द्या परिवर्तनाची नांदी आणू : पालकमंत्री सुभाष देशमुख ; भाजपने प्रचाराचा नारळ फोडला

0

जत,प्रतिनिधी : गेल्या पाच वर्षात जत शहराला भकास करून जतला विकासापासून मागे ठेवले आहे. त्यामुळे यंदा भाजपला सत्ता द्या जतचा चेहरामोहरा बदलू असे प्रतिपादन सहकार तथा पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी केले. ते जत नगरपालिकेच्या निवडणूकीच्या भाजप प्रचाराचा शुभारंभ प्रंसगी बोलत होते. जतचा पालिकेच्या भाजप प्रचाराचा नारळ शुक्रवारी पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते फोडण्यात आला.यावेळी खा.संजय पाटील, जिल्हाअध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, आ. विलासराव जगताप, डॉ. रविंद्र आरळी,सभापती तम्मानगोंडा रवी,शिवाजीराव ताड,संजय कांबळे,अॅड. प्रभाकर जाधव, सरदार पाटील, सुनिल पवार,चंद्रकांत गुड्डोडगी आदि मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री देशमुख पुढे म्हणाले, गत अनेक निवडणूकीत कॉग्रेस, राष्ट्रवादी कॉग्रेसच्या नेत्यांनी सत्ता भोगली,मात्र शहराचे प्रश्न तसे राहिले आहेत. आश्वासनाचे पाऊस पडले मात्र शहर कायम भकास राहिले आहे.भाजपने तालुक्याचा विकास केला आहे. विकासाच्या परिवर्तनात शहरातील जनतेनी सहभागी होऊन भाजपच्या नगराध्यक्ष सह सर्व नगरसेवकांना बहुमताने निवडून द्या. असेही आवाहन देशमुख यांनी केले.भाजपने जे कॉग्रेसला साठ वर्षात जमला नाही असे अनेक योजना मोदी सरकारने पुर्ण केल्या आहेत. कर्जमाफीत अर्ज आलेल्या शेतकऱ्यां पैंती 75 टक्के शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे देण्यात येतील तशा सर्व प्रक्रिया पुर्ण करण्यात येत आहेत.भाजप सरकारच्या विकास प्रवाहात जत शहरातील जनतेनी सहभागी व्हावे असेही देशमुख शेवटी म्हणाले.

Rate Card

खा. संजय पाटील म्हणाले,यापुर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी जतला मागे ठेवले आहे. जत शहर विकासापासून वचिंत राहिले आहे. भाजपकडून जतच्या विकासाठी सर्व प्रयत्न सुरू आहेत. पुर्व भागातील जनतेसाठी पाणी योजनाही अंतिम  टप्प्यात आहे. दोन्ही राज्यातील अधिकाऱ्यांच्या चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. जतच्या विकासासाठीही भाजपचे व्हिजन तयार आहे. जनतेनी विश्वास दाखवावा.

आ. विलासराव जगताप म्हणाले, भाजपला उमेदवार मिळत नसल्याचा विरोधकांनी आरोप केला गेला.मात्र नगराध्यक्ष सह नगरसेवकांचे सक्षम पॅनेल आम्ही उभे केले आहे. आमचे सर्व उमेदवार विजयी होतिल. कॉग्रेसकडून भष्ट्राचाराची टोळी सामिल झाली आहे. त्यामुळे अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यत त्यांचा गोधळ मिटला नाही.भष्ट्र टोळीतीला एकाला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली आहे. तो जतचा विकास कसा करू शकेल असा सवाल आमदार विलासराव जगताप यांनी उपस्थित केला.पालिकेचा एकही सदस्य जिल्हा नियोजन मध्ये नसतानाही जिल्हा नियोजन मधून शहराला मोठा निधी दिला आहे. सत्ताधाऱ्यांनी त्या कामातही कमिशन खाले आहे. ही निवडणूक परिवर्तनाची नांदी आहे. त्यामुळे शहराच्या विकासासाठी मतदारांनी भाजपच्या उमेदवारांना संधी द्यावी असे आवाहन आ. जगताप यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.