जत नगरपालिकेत कॉग्रेसचा विजय निश्चित माजी मंत्री पंतगराव कदम : पक्ष कार्यालयाचे उद्धाटन

0

जत,प्रतिनिधी : भाजप सरकार विषयी नाराजी मुळे कॉग्रेसला पुन्हा चांगले दिवस आले आहेत. त्यामुळे उमेदवार,नेेते, कार्यकर्त्यांनी ंमतदारांना पक्षाचे महत्व व व्हिजन पटवून द्या.जतकरांचे कॉग्रेसवर प्रेम आहे. कॉग्रेसच जतचा विकास करेलं.असे प्रतिपादन माजी मंत्री आ. पंतगराव कदम यांनी केले.जत नगरपालिकेच्या निवडणूकीसाठीचे कॉग्रेसच्या पक्ष कार्यालय उद्धाटन प्रंसगी कदम बोलत होते. शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्र शेजारी कार्यालय उघडण्यात आले आहे.यावेळी कॉग्रेस नेते विक्रम सांवत, माजी आमदार उमाजीराव सनमडीकर, तालुकाध्यक्ष आप्पाराय बिराजदार, उपाध्यक्ष कुंडलिक दुधाळ,महादेव पाटील,नाना शिंंदे आदि मान्यवर उपस्थित होते.

कदम पुढे म्हणाले,जत नगरपालिकेत कॉग्रेसची सत्ता आली पाहिजे,पालिका निवडणूकीत इच्छूंक उमेदवारी मिळाली नाही म्हणून नाराज न होता. त्यांची नाराजी दूर करून कामाला लावा.भाजप सरकारने गेल्या तिन वर्षात जनतेचा भम्रनिरास केला आहे. खोटी आश्वासने देऊन फसविले आहे.मोठ्या गर्जना करत पाच कोटी बेरोजगारांना नोकऱ्या मिळतील म्हणारे सरकार प्रत्यक्षात पाच लाख लोंकाना रोजगार उपलब्धं करू शकले आहे. त्यामुळे बेरोजगारी वाढली आहे.कर्जमाफीत शेतकऱ्यांना अपेक्षीत लाभ नाही,शेतमालाला भाव नाही,जनतेला नोटा बंदी व्यापाऱ्यांनी जिएसटी सारख्या योजना आणून त्रास दिला आहे. उद्योग धार्जिनी भाजप सरकार विषयी प्रंचड नाराजी पसरली आहे. सरकारकडून अपेक्षा संपलेल्या असून आता कॉग्रेस बरं म्हणायची वेळ जनतेवर आली आहे. 

कदम म्हणाले,जत शहरात कॉग्रेस चांगले वातावरण आहे.आपला विजय निश्चित आहे. सर्व कार्यक्रत्यांनी नाराजी दूर करून एकसंघ लढून सत्ता आणावी असे आवाहन कदम यांनी शेवटी केले.

Rate Card

फोटो

जत नगरपालिकेच्या निवडणूकीतील कॉग्रेस पक्ष कार्यालया प्रंसगी सभेत बोलताना माजी मंत्री आ. पंतगराव कदम 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.