अपहरण केलेल्या मुलांचा शोध लावावा या मागणीसाठी कुंटुबियाचे उपोषण सुरू

0

दरिबडची, वार्ताहर :अंकलगी (ता जत )येथील राघवेंद्र संगाप्पा अक्कलकोट यांचे अपहरण होऊन वीस दिवस झाले त्याचा अद्याप शोध घेण्यात उमदी पोलिसांना अपयश आले आहे.त्यामुळे आम्हाला न्याय मिळावा या मागणीसाठी राघेंवद्र यांचे कुटूंबियांनी गुरूवारी जत तहसिल कार्यालया समोर उपोषणास बसले आहेत. शिवाय त्यांना पांठिबा देण्यासाठी गाव बंद ठेवण्यात आले होते.

 राघेंवद्र अपहरण प्रकरणातील संशयीत आरोपीला जामीन मिळाला आहे.हा गावात मोकाट फिरत आहे.त्याची गावात दहशत आहे.त्यांचा निषेध करत अंकलगीतील पालकांनी बुधवारी शाळेत पाठविले नव्हते,त्यामुळे प्राथमिक व माध्यमिक बुधवारी शाळा बंद होत्या.पूर्व भागातील अंकलगी येथील शेतमजूर राघवेंद्र संगाप्पा अक्कलकोट हा आपल्या आई वडील पत्नी मुले व बहीण समवेत एकत्रीत राहतात.26 नोव्हेंबर रोजी शेजारील तानाजी चिदानंद कोळी यांने राघेंवद्रला संख येथे घेऊन गेला होता.तेव्हापासून राघेंवद्र गायब झाला आहे.याबाबत उमदी पोलीस ठाण्यामध्ये गायब झाल्याची फिर्याद भाऊ सुरेश अक्कलकोट यांनी दिली आहे.        

Rate Card

 पोलीसांनी त्याला अटक करुन जुजबी कार्यवाही करण्यात आली आहे असा आरोप राघेंवद्र यांच्या कुंटूबियांनी केला आहे. संशयीत आरोपी सध्या गावात फिरत आहे.त्यांच्या दहशतीमुळे गावात घबराट फसरली आहे.

त्यामुळे पालकांनी शाळेला मुलेच पाठविले नाहीत.यापूर्वी ग्रामस्थांनी उमदी पोलिस ठाण्यावर 18 नोव्हेंबरला धडक मोर्चा काढला होता.त्यावेळी मंगळवार पर्यंत शोध घेतो असे आश्वासन दिल्याने ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन मागे घेतले.संशयीत आरोपीस अटक केली लगेच सुटका केली आहे.त्यांनी गावात येऊन राघेंवद्र प्रमाणे कुटुंबातील अन्य मुलांचेही अपहरण करण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे अक्कलकोट कुटुंब भयभीत मानसीक दडपणाखाली आहे.             

                                                  

उमदी पोलिसाचा कारभार वादाच्या भोव-यात;

 आठवड्यांपूर्वी जाडरबोबलाद येथील बिजरगी यांचे ही अपहरण झाले आहे.त्याचा ही शोध लागला नाही.त्या कुटुंबियांनी तहसिल कार्यालयसमोर उपोषण केले होते. 

किडनी राॅकटचा गावक-यांचा संशय;संशयीत आरोपीचे गावात वर्तन चांगले नाही.भुरटी चोरी, लफडे यासारखे गुणे आहेत.त्यामुळे अपहराणाच्या पाठीमागे किडणी राॅकेटचा संशय ही गावकरी व्यक्त करीत आहेत. त्यादृष्टीने तपास करण्याची गरज आहे.

फोटो

अंकलगीतील अपहरण झालेल्या राघेंवद्र यांचा शोध लागावा या मागणीसाठी कुंटुबियाचे उपोषण सुरू केले. त्यांना पांठिबा देण्यासाठी गाव बंद ठेवण्यात आले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.