पीआरसीने काढले डफळापूर ग्रामपंचायतीच्या कारभाराचे वाभाडे अनेक कामात अनियमितता, अपुर्ण दप्तर,अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणाच्या चौकशीचे आदेश : हायस्कूल, प्राथमिक आरोग्य केंद्राची तपासणी

0

जत, प्रतिनिधी : जिल्ह्यात आलेली पंचायत राज समितीने  (पीआरसी) गुरूवारी जत तालुक्याचे मुख असलेल्या डफळापूरात हायस्कूल, जिल्हा परिषद शाळा,ग्रामपंचायत,व आरोग्य केंद्राला भेट दिली. ग्रामपंचायत कार्यालयात लोंकाच्या तक्रारीची दखल घेत व दप्तराची तपासणी करत अनेक त्रुटीवर आक्षेप घेत सर्व कामाचे अक्षरश: वाभाडे काढले.डफळापूर ग्रामपंचायतीकडून झालेल्या मुरमीकरण रस्ते,अंपग निधी,शाळांना दिलेले पाणी फिल्टर,अभ्यास सहल,ग्रामनिधी, एलइडी घोटाळा वर ग्रामस्थानी केलेल्या तक्रारीची चौकशीसाठी होत असलेल्या विलबांबाबत तालुका, जिल्हा पातळीवरील यंत्रणा पाठिशी घालत आहेत. ग्रामपंचायत कामात मोठा घोटाळा झाला आहे. यांची चौकशी करण्याची मागणी माजी ग्रामपंचायत सदस्य पोपट पुकळे यांनी केली.

पुकळे यांनी सर्व योजनावर , कशी उधळपट्टी झाली,बोगस कामे,कामे न करताच काढलेले पैसे, दर्जाहीन वस्तू खरेदी यावर सविस्तर व त्यांनी दाखल केलेल्या तक्रारीचे प्रती उपस्थित पिआरसीचे आ.विक्रम काळे,दत्तात्रय सांवत यांच्या समोर मांडले.आमदारांनी अधिकारी व संबधित ग्रामसेवक,टिपीओ,बिडिओचा पंचनामा करत अनेक कागदपत्राची पाहणी केली.त्यात अनेक त्रुटी,अनियमितता बाबत जाब विचारला मात्र संबधित यंत्रणेला व्यवस्थित माहिती देता आली नाही. पंचायत राज समितीने प्रारंभापासूनच प्रत्येक मुद्यावर उलटतपासणी घेत आक्रमक पवित्रा स्पष्ट केला. ग्रामसेवक,टिपीओ, बिडिओ, मुख्य कार्यकारी अधिकारी, खातेप्रमुख यांच्यावर प्रश्‍नांची सरबत्ती केली. शिक्षण विभागासाठी दिलेले फिल्टर,  खरेदीप्रकरणी अधिकार्‍यांना धारेवर धरले. ग्रामपंचायतींकडील प्रत्यक्ष समोर आलेल्या दप्तर मधून बरचं काही अस्पष्ट होत असल्याने,अर्धवट कागदपत्रे प्रकरणीही समितीने बरेच सुनावलेे.

डफळापूर ग्रामपंचायतीच्या नळपाणी योजना,अभ्यास सहल,शाळांना दिलेले फिल्टब,मुरमीकरणाचे काम,ग्रामनिधी व एलइडी घोटाळा यांच्या चौकशीचे आदेश दिलेत. आ. काळे व सांवत यांच्याबरोबर जिल्हा,तालुक्यातील अधिकाऱ्यांचा मोठा लवाजमा होता. प्रांरभी राजे विजयसिंह हायस्कूलच्या थेट वर्गात जात तपासणी केली. मुंलाना व्यवस्थित शिकविले जाते का?याबाबत विचारणा केली.त्यांनतर पथक ग्रामपंचायत कार्यालयात आले. तेथे ग्रामस्थानी तक्रारीचा पाठा वाचला,सर्व तक्रारीची शहानिशा करत उपस्थित आमदार महोदयांनी सर्व कागदपत्राची ऑन दिस्पॉट तपासणी केली.त्यात अनेक त्रुटी आढळल्या,ग्रामसेवक,टिपीओ, बिडिओ,जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या हल्लगर्जी पणाचा पंचनामा करत सर्वांचे चौकशीचे आदेश दिलेत. त्यांनतर मुरमीकरण न करता पैसे उचललेल्या ग्रामपंचायत ते बुंवानंद मंदिर रस्त्याची पाहणी केली. शेवटी प्राथमिक आरोग्य केंद्रात जात थेट रुग्णांना व्यवस्थित औषध उपचार मिळतात का? डॉक्टर उपस्थित असतात का? याबाबत विचारणा करत केंद्रातील विविध विभागाची पाहणी केली. 

चौकट

अधिकाऱ्यांना पळविले

Rate Card

गुरूवारी डफळापूरात आलेले पिआरसीचे पथकाने अधिकाऱ्यांनाही चांगलेच पळविले. ग्रामपंचायतीमधील ग्राहाणी ऐकूण घेऊन आम महोदय यांनी बोगस काम केलेला रस्ता चालत जाऊन पाहिला. तेथून अचानक आरोग्य केंद्र पाहणीचे ठरविले व तेथून सुमारे चारशे मीटरवर असलेल्या केंद्रात चालतच निघाले. कायम वाताणुकूलीत गाडी,व ऑफिस मध्ये वावरणारे अधिकाऱ्यांची यामुळे मात्र चांगलीस पळापळ झाली.

फोटो :

डफळापूर ग्रामपंचायतीच्या कारभाराच्या तक्रारीचे थेट जनतेची ग्राहणे ऐकत ऑनदी स्पॉट कारवाई करताना पिआरसीचे पथकातील आ. विक्रम काळे,दत्तात्रय सांवत यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.