राष्ट्रवादी कॉग्रेस,भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार घोषित कॉग्रेसच्या वेगळ्या रणनितीची चर्चा

0

जत,प्रतिनिधी :

जत नगरपालिका निवडणूकीतील राष्ट्रवादी कॉग्रेस व भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार घोषित झाले आहेत. तालुक्यातील मोठे सत्ताकेंद्र असलेली नगरपालिका ताब्यात ठेवण्यासाठी तालुक्यातील प्रमुख पक्ष असलेले भाजप,कॉग्रेस व राष्ट्रवादी कॉग्रेसनी जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यात नगराध्यक्ष सह सदस्यांची उमेदवारी घोषित करून राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते माजी सभापती सुरेश शिंदे यांनी आघाडी घेतली आहे. तर भाजपकडून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार घोषित करण्यात आला आहे. भाजपचे जेष्ठ नेते नामवंत डॉक्टर यांच्या पत्नी उच्चविद्या विभुषित डॉ. रेणुका आरळी यांची नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. तर राष्ट्रवादी कॉग्रेसने शहरातील राजकीय बडे प्रस्त असलेले राजू इनामदार यांच्या पत्नी शबाना इनामदार यांची उमेदवारी घोषित केेली आहे. त्यांही उच्चशिक्षित व राजकीय घराण्यातील आहेत. कॉग्रेसकडून अद्याप नगराध्यक्ष पदाचा उमेदवार घोषित नाहीत. कॉग्रेसकडून विद्यमान नगरसेवक शुंभागी बन्नेनावर व माजी जिल्हा परिषद सदस्या मिनाक्षी अक्की यांच्यात स्पर्धा आहे.

Rate Card

त्यांच्या शिवाय अन्य उमेदवारीची चाचपणी कॉग्रेस नेत्याकडून सुरू आहे.ऐनवेळा वेगळा चेहराही असू शकतो. कॉग्रेसकडून लवकरच नगराध्यक्ष पदाचा उमेदवार घोषित होईल असे सांगण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.