मोहन माळी इंटरनॅशनल स्कूलमध्ये बाजार दिवस साजरा

0

अलकुड : अभिनव फौंडेशन संचलित मोहन माळी इंटरनॅशनल स्कूलमध्ये बाजार दिवस(vegetable market day) घेण्यात आला

बाजार कसा असतो ,फळे, भाजीपाला बाजारामध्ये कोणकोणत्या गोष्टी मिळतात,त्या कोठून आणल्या जातात व त्याची विक्री कशी होते.कोणते फळ,कोणती भाजी, किती रुपयाला मिळते.या सर्व गोष्टी मुलांना समजाव्यात स्वत: अनुभव घेऊन काही गोष्ठी मुलांना शिकता यावे यासाठी या दिवसाचे आयोजन करण्यात आले होते.

पावशेर ,अर्धा ,1 किलो हि सर्व परिमाणे म्हणजे काय असतात हे मुलांना समजावण्यात आले आणि यातून मुलांच्या गणितीय ज्ञानात भर पडली.मुलांनी स्वतः भाज्या, फळभाज्या घरातून आणल्या होत्या व त्याची विक्री शाळेमध्ये करण्यात आली यातून मुलांच्या व्यवहारज्ञानात भर पडली.पालेभाज्या शेतामध्ये कशा तयार होतात. व त्या तयार करण्यासाठी शेतकऱ्यास किती कष्ट करावे लागतात याची माहितीही मुलांना देण्यात आली.बाजार दिवस या कार्यक्रमाचे उदघाटन शाळेचे संस्थापक अध्यक्ष मोहन माळी यांनी केले.बाजार दिवसाचे नियोजन शाळेतील सर्व शिक्षकांनी प्रिन्सिपल सौ.कविता मेहरा मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली केले.

Rate Card


फोटो : 

मोहन माळी इंटरनॅशनल स्कूलमध्ये बाजार दिवसात बाजारात भाजीपाला विक्री करण्यासाठी बसलेले विद्यार्थी

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.