राष्ट्रवादी कॉग्रेसच्या उमेदवारांचा प्रचार सुरू नगरपालिका निवडणूक : दोन तपाहून जास्त काळ सत्ताकेंद्र ताब्यात असलेले माजी सभापती सुरेश शिंदेचे फासे ओपन

जत,प्रतिनिधी : जत नगरपालिका निवडणूकीतील राष्ट्रवादी कॉग्रेसचे उमेदवार शुक्रवारी घोषित होताच. उमेदवारी मिळाल्यांनी प्रचारास सुरूवात केली आहे. राष्ट्रवादी कडून लवकर उमेदवारी घोषित झाल्याने नगराध्यक्ष पदासह सर्व उमेदवारांना मतदार भेटीच्या दोन तिन फेऱ्या होणार आहे. अवधी भरपूर असल्याने होमटू होम प्रचार राबविणे शक्य होणार आहे.
जत शहरातील वीस तपाहून ग्रामपंचायत ते नगरपालिकेचे सत्तास्थाकेंद्र ताब्यात असणारे माजी सभापती सुरेश शिंदे यांना गत वेळी मोठा दगाफटका झाला आहे. त्यांनी निवडून आणलेले नगरसेवक विरोधात गेल्याने त्यांनी यावेळी सावध पवित्रा घेत सर्व उमेदवार नविन चेहरे दिले आहेत.
उमेदवारी घोषित झालेले उमेदवारांनी घर टू घर जात सत्ताधारी पदाधिकाऱ्यांनी शहराची कशी वाट लावली व त्यांच्या भष्ट्र कारभाराने शहराची बेअब्रू कशी झाली हे पटवून देत आपले विकासाचे व्हिजन मतदारांना पटवून देण्याच्या सुचना शिंदे यांनी दिल्या आहेत. नगरपालिकेवर सत्ता मिळवायची असा चंग बांधलेले सुरेश शिंदे यांनी सर्वांच्या अगोदर उमेदवार घोषित करून आघाडी घेतली आहे. सर्व चेहरे उच्चशिक्षित,स्वच्छ प्रतिमेचे ही त्यांची ताकत आहे. अवधी भरपूर असल्याने प्रचाराच्या दोन तिन फेऱ्या होणार आहेत. प्रांरभी उमेदवारांना प्रचाराला धाडले आहेत. शिंदे व निवडक शिलेदार वेगळा पध्दतीने प्रचार यंत्रणा राबवून विरोधकांना घेरण्याची तयारी केली आहे. अखेरच्या टप्प्यात स्टार नेत्यांच्या सभा होणार आहेत. त्यात माजी मुख्यमंत्री अजित पवार, विधानपरषदेचे विरोधी पक्षनेते धनजंय मुंडे, खा. सुप्रिया सुळे,माजी मंत्री जंयत पाटील, हसन मुश्रीप यांच्या सभा अपेक्षित आहेत. गेल्या विस वर्षातील अनभुवानुसार शिंदे अखेरची सभा गाजविणार आहेत.विरोधकांची भ्रष्ठ कृत्ये मतदारांसमोर मांडून नेस्तनाभूत करण्याची तयारी सुरू झाली आहे.
नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सौ.शबाना रफिकअहमद उर्फ राजू इनामदार ह्या उच्चशिशक्षित राजकीय वारस असलेले उमेदवार आहेत. शिवाय जत शहरातील
मुस्लिम समाजाच्या एकमुखाने दिलेले उमेदवार असल्याने त्यांच्या समाजासह शहरातील जनतेचा मोठा पांठिबा त्यांना मिळत आहे.त्याच्या उमेदवारीने विरोधकासमोर मोठे आवाहन उभे ठाकले आहे. सर्व यंत्रणा गतिमान झाल्याने प्रांरभी राष्ट्रवादी कॉग्रेसचे उमेदवार एक पाऊल पुढे असल्याचे चित्र आहे.
