जिरग्याळ उपसंरपच निवडीवेळी सदस्य उचलले या कारणावरून दोन गटात तुंबळ हाणामारी

0

Rate Card

जत,प्रतिनिधी :जिरग्याळ ता.जत येथील उपसंरपच निवडीवेळी गोंधळ उडाल्याने निवड झाली नाही.

सदस्य उचलले या कारणावरून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. त्यामुळे शनिवारची निवड रद्द करून पुढे ढकलण्यात आली आहे.

जिरग्याळ ग्रामपंचायतीची निवड तिंरगी झाली आहे. त्यात तिन्ही गटाचे एक-दोन सदस्य निवडून आले आहेत. त्यामुळे उपसंरपच निवड लक्षवेधी ठरली होती. त्यात एका गटाने सहा सदस्य  सहलीवर पाठविले होते. त्यामुळे दुसऱ्या गट नाराज होता. शनिवारी उपसंरपच निवडीवेळी  सदस्य उचलण्यावरून दोन्ही गटात बाचाबाची सुरू झाली. त्यांचे रुंपातर हाणामारीत झाले. गोंधळ उडाल्याने उपसंरपच निवड रद्द करण्यात आली आहे. दोन्ही गटाकडून परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्यासाठी कार्यक्रर्ते पोलिस ठाणे आवारात जमले होते. रात्री उशिरापर्यत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.हुल्ल्यापा पाटील गटाचे 5,लंगोटे गटाचा 1 व कोरे गटाचे ३ असे सदस्याचे बलाबल होते. दीपक लंगोटे सरपच आहेत.                                                                                                                                     

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.