डफळापूरचे बाहुबली मन्सूर खतीबचं संरपच, उपसंरपच पदासह दहा सदस्यांचे बंळ : विरोधकांनी घेरले तरीही किंगमेकर ठरले

0

डफळापूर, वार्ताहर : जत तालुक्यातील चर्चेतील गाव सुनिल बापू चव्हाण यांनी आजमाअमर केले. त्यांच्या पश्चात विकुरलेले सत्ताकेंद्र त्यांचेच जिवलग मित्र असलेले माजी सभापती मन्सूर खतीब यांच्या भवतीच खेळते आहे. जिल्हा परिषद निवडणूकीतील काटावरचा पराभव विसरून खतीब यांनी केलेली बांधऩी वाखण्याजोगी आहे. डफळापूर ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत विरोधकांनी त्याच्यासह त्यांच्या शिलेदारांना घेरले असतानाही त्यांनी थेट संरपच पदासह उपसंरपच व दहा सदस्य आपल्याकडे खेचून आणत आपणचं बाहुबली असल्याचे सिध्द केले आहे.

परिसरात चाचा गट म्हणून उदयास आलेल्या मन्सूर खतीब यांचे नेतृत्व स्विकारले आहे. जत तालुक्यातील बिरबल म्हणून प्रसिध्द असणाऱ्या खतीब यांनी डफळापूर ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत विरोधकांनी अनेक मुद्यावर बहुजन क्रांती पँनेलच्या सर्व उमेदवारांवर आरोप केले होते.प्रांरभी भ्रष्टाचार समोर आणून प्रचारात आघाडी घेतली होती. मात्र खतीब यांनी निर्णायक फासे टाकत आपली बिरबल नितीने कॉग्रेसला बँकफूट वर घालविले आहे. पहिले लोकनियुक्त संरपच, सहा सदस्य निवडून आणत त्यांनी अनपेक्षित यश मिळविले होते. कॉग्रेसचे नऊ सदस्य निवडून आले होते. तशात उपसंरपच पदासाठी लागलेल्या निवडणूकीत सहा सदस्य असतानाही अपक्ष,व कॉग्रेसचे दोन सदस्य फोडून उपसंरपचपदी अपक्षाला बसविण्याचा इतिहास खतीब यांनी घडविला आहे.

Rate Card

बापूच्या पश्चात एकाकी पडलेल्या खतीब यांनी जी गटाची मजबूत बांधणी केली आहे. त्यामुळे डफळापूर ग्रामपंचायतीच्या पुन्हा त्यांच्या गटाचे वर्चस्व सिध्द झाले आहे.

तालुक्यातील चर्चेत चेहरा म्हणून ते प्रसिध्द आहेत. अल्पसंख्यांक समाजात जन्माला येऊनही त्यांनी राजकारणात मिळविलेले यश प्रस्तापित राजकारण्याना लाजवेल असे आहे. डफळापूरातील सत्ते मुळे पुन्हा ते डफळापूर सह पश्चिम भागातील ताकतवान नेते बनले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.