रखडलेली विकासकामे प्रचाराचा मुद्या ठरणार पाच वर्षे आरोप पत्यारोपानेच नगरपालिका गाजली ;कोट्यावधीचा निधी फस्त तरीही शहर भकास

0

जत,प्रतिनिधी :जत नगरपालिकेच्या निवडणुकीची राजकीय रणधुमाळी सुरू झाली आहे. वीस नगरसेवक व थेट नगराध्यक्षपदासाठी  निवडणुकीचे धुमशान सुरू झाले आहे. राष्ट्रवादी, काँग्रेस व भाजप नेत्यांनी रणसिंग फुकले आहे. त्यामुळे अत्यंत लक्षवेधी तिंरगी किंवा चौंरगी सामना रंगणार हेही स्पष्ट झाले आहे.जत नगरपालिका स्थापन होऊन पाच वर्षे झाली. कोट्यावधीचा निधी खर्च झाला आहे. मात्र जत करांना अपेक्षित विकास करण्यात गत वेळचे पदाधिकारी कमी पडल्याचे आरोप आहेत. विकास कामांना निधी खर्च होतांना भष्ट्राचारचे गंभीर आरोप विरोधी नगरसेवकांनी केले. तीन वर्षापुर्वी तेच सत्तेत होत हेही विसरून चालणार नाही. प्रत्यक्षात जनतेच्या समस्येसाठी सत्तेची हवा डोक्यात भिनलेले नगरसेवक प्रयत्न किती केले यावर संशोधन करावे लागेल. सत्ताधारी व विरोधक नगरसेवकांनी फक्त स्व:हितासाठी आंकाडतांडव केल्याचे आरोप जनता करत आहे. प्रत्यक्षात विकास कामे मंजूर केली ती विरोधी गटातील एका नगरसेवकांने रखडविल्याचे आरोप सत्ताधारी पदाधिकाऱ्यांनी निवडणूक लागण्याअगोदर केले, त्या बऱ्यांच अंशी तथ्य आहे. शहरातील बरीच विकास कामे अर्धवट स्थितीत गेल्या अनेक वर्षापासून आहेत. त्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छ. शिवाजी महाराज ही सुटले नाहीत. चार वर्षापुर्वी शहरातील शिवाजी चौकातील त्यांचा ऐतिहासिक पुतळ्या भोवतीचे बांधकाम एका अपघातात पडले. त्यांचे बांधकाम करण्यासाठी अनेकजण पुढे सरसावले,लोकवर्गणीही काढली,काही लाखाचा शासकीय निधीही आला मात्र आजपर्यत चंबुतऱ्यांच्या बांधकामापुढे पुतळ्याचे काम सरकले नाही. पुतळा कोणी रखडविला हाही मुद्या या निवडणूकीत समोर येईलच मात्र; यातही राजकारण झाल्याची चर्चा आहे. पुतळा बांधकामासाठी अंदोलनेही झाली तरही दखल घेतली नाही. तशीच परिस्थिती शहरातील अनेक रस्ते,गटारीसह अनेक कामाची आहे. यात अनेकजण दोषी आहेत. यावरही येत्या निवडणूकीत खल होण्याची शक्यता आहे.त्यामुळे यंदाची निवडणूकीत कशी रंगणार हे औत्सुक्य आहे. कामांच्या बाबतीत पाच वर्षांत अनेक नगरसेवकांची पाटी कोरीच आहे. त्यामुळे त्यांच्या कारभाराचा पर्दाफाश करण्याची तयारी सुरू झाली आहे.दि. 20 डिसेंबररोजी विद्यमान नगरमंडळाची मुदत संपत आहे. यल्‍लमादेवीच्या यात्रेमुळे निवडणूक वेळापत्रकात बदल करून कार्यक्रम दोन दिवस आधी घेतला आहे. दि. 13 ऐवजी दि. 10 डिसेंबरला मतदान होणार आहे. दि. 16 नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. दि. 11 डिसेंबरला जनतेचा कौल कोणाच्या बाजूने आहे, हे स्पष्ट होणार आहे.

Rate Card

सध्या राज्यात राजकीय वातावरण  शांत आहे. त्यामुळे  येथे स्टार प्रचारकांच्या सभांचा धुरळा उडणार आहे. भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेसच्या अनेक दिग्गजांच्या जाहीर सभा घेण्याचे नियोजन नेत्यांकडून सुरू आहे. सर्वच पक्ष ताकद पणाला लावणार असल्याने निवडणूक लक्षवेधी होणार आहे. निवडणुकीत शहराचा विकास हा कळीचा मुद्दा ठरणार आहे. नगरपालिकेची पहिली निवडणूक ही विकासाच्या अजेंड्यावर झाली होती. तीत जनतेने त्रिशंकू कौल दिला. तरीही पाच वर्षात शहराचा विकास होण्याऐवजी शहर भकास केल्याचा विरोधकांचा प्रचारात प्रमुख मुद्दा राहणार आहे.  पालिकेतील सत्ताधारी गटाचे नेते सुरेश शिंदे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. जुन्या टीमची त्यांनी हकालपट्टी केली आहे. नव्या चेहर्‍यांच्या माध्यमातून निवडणूक लढविण्याचे जाहीर केले आहे. माजी मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत त्यांनी प्रचाराला सुरूवातही केली आहे. सुरेश शिंदे यांच्याकडील नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांच्यासह काही नगरसेवक काँग्रेसमध्ये गेले आहेत. विक्रम सावंत यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी झाली आहे.भाजपचे  आमदार विलासराव जगताप यांनी नगरपालिकेत मित्रपक्ष आरपीआय, रासप, शेतकरी संघटना यांना सोबत घेऊन निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. शहराला भकास बनविणार्‍या काँग्रेस व राष्ट्रवादीला यावेळी जनता धडा शिकवेल, असा विश्‍वास आमदार जगताप यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.